बाबो! एकाच वर्षात दोनदा प्रेग्नेंट झाली ही महिला, १० महिन्यांत दिला ३ बाळांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 02:34 PM2021-09-15T14:34:53+5:302021-09-15T14:38:06+5:30
एक प्रेग्नन्सीचं (Pregnancy) असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. पण ही मुलं एकाच वेळी जन्माला आलेली नाहीत तर ही महिला १० महिन्यांत चक्क दोनदा प्रेग्नंट झाली.
एकाच वेळी एक बाळ जन्माला येतं. तसेच काहीवेळा जुळ्या बाळांचा जन्म होतो. तीन किंवा चार बाळांचाही एकाचवेळी जन्म झाल्याची प्रकरणं आपण ऐकली असतील. पण आता एक प्रेग्नन्सीचं (Pregnancy) असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. पण ही मुलं एकाच वेळी जन्माला आलेली नाहीत तर ही महिला १० महिन्यांत चक्क दोनदा प्रेग्नंट झाली.
ही गोष्ट आहे, युकेत राहणाऱ्या २३ वर्षीय शॅरना स्मिथ (Sharna Smith) हीची. तिने ६ जानेवारी २०२० रोजी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्याचवर्षी ती पुन्हा प्रेग्नंट झाली आणि ३० ऑक्टोबर, २०२० ला तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. शॅरनाची तिन्ही मुलं आता एक वर्षांची झाली आहेत. तिचा जोडीदारासोबत तिचं नातं तुटलं आहे. पण ती आपल्या तिन्ही मुलांसोबत आनंदाने राहत आहे.
याआधीसुद्धा अमेरिकेत प्रेग्नन्सीचं असंच एक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये पहिल्या बाळाच्या जन्मानंतर ५ दिवसांतच महिलेची दुसरी डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिला जुळी मुलं झाली. न्यूयॉर्कमधील ३३ वर्षांची कायली डेशनच्या पहिल्या बाळाचा जन्म २८ डिसेंबर २०१९ ला झाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळाचा जन्म २ जानेवारी, २०२० रोजी झाला.