महिलेने फुकटात भरून घेतलं 22 लाख रूपयांचं पेट्रोल, तिचा कारनामा वाचाल तर व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:44 AM2024-03-16T11:44:36+5:302024-03-16T11:44:58+5:30
एका महिलेने पॉइंट्सचा वापर करून मोफत चक्क 22 लाख रूपयांचं पेट्रोल भरून घेतलं. तिने अशी आयडिया केली की, तुम्हीही वाचून हैराण व्हाल.
पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेल्यावर तुम्ही कधी कॅश देत असाल, तर कधी फोनपे किंवा पेटीएम करत असाल किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल. यावर काही रिवार्ड्स पॉइंट्स मिळतात. जे पुढच्या वेळी कामात येतात. पण एका महिलेने तर याच पॉइंट्सचा वापर करून मोफत चक्क 22 लाख रूपयांचं पेट्रोल भरून घेतलं. तिने अशी आयडिया केली की, तुम्हीही वाचून हैराण व्हाल.
मेट्रोच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारी 45 वर्षीय डॉन थॉम्पसन रोज नेब्रास्काच्या एका पंपावरून पेट्रोल भरत होती. यासाठी रिवार्ड कार्डचा वापर करत होती. तिच्या पॉइंट्सने ती बिल देत होती. तिला एकही पैसा द्यावा लागत नव्ता. पण एका गडबडीमुळे तिने लाखो रूपये वाचवले होते. झालं असं की, 2022 मध्ये पेट्रोल पंपाने आपलं सॉफ्टवेअर अपडेट केलं. त्यानंतर त्यात बिघाड झाला.
यामुळे झालं असं की, याने लॉयल्टी कार्ड असलेल्या ग्राहकाना संधी मिळाली. कारण जर तुम्ही या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोनदा कार्ड स्वाइप केल तर पेट्रोल पंपचं सॉफ्टवेअर डेमो मोडवर जात होतं. म्हणजे सगळंकाही डेमोच्या माध्यमातून होत होतं. म्हणजे यासाठी काही पैसे द्यावे लागत नव्हते. या महिलेने जेव्हा हे पहिल्यांदा पाहिलं तर पुन्हा पुन्हा ती असंच करत होती. तिचा एक रूपयाची कट झाला नाही. असं करत करत महिलेने एका वर्षात 510 वेळा पेट्रोल भरलं. कधी कधी तर ती दिवसातून अनेकदा पेट्रोल भरायला येत होती.
कसा झाला खुलासा?
एक वर्षाने जेव्हा पेट्रोल पंपच्या लोकांनी हिशेब केला तेव्हा त्यांना बिघाडाचा संशय आला. त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की, महिलेने 27 हजार डॉलर म्हणजे साधारण 22 लाख रूपयांचं पेट्रोल मोफत भरलं. त्यांनी लगेच पोलिसांना संपर्क केला.
सीसीटीव्ही कॅमेरात थॉम्पसन अनेकदा पंपावर पेट्रोल भरताना दिसली. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने 13 नोव्हेंबर 2022 ते 1 जून 2023 दरम्यान रिवॉर्ड कार्डचा वापर करून 510 वेळा पेट्रोल भरलं. पोलिसांना कार्डचा वापर करणाऱ्या आणखी एका महिलेची माहिती मिळाली. चौकशी केली तर महिलेने सांगितलं की, तिला याबाबत माहीत नव्हतं. ती पूर्ण पैसे भरण्यास तयार आहे. सध्या ही केस कोर्टात सुरू आहे.