बाबो! महिलांचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरायचे सोडून पुरुषांचे प्रोडक्ट वापरते ही महिला, करते शेविंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:56 PM2022-04-06T13:56:52+5:302022-04-06T13:57:02+5:30
एका महिलेला मात्र ब्युटी नव्हे तर चक्क मेन्स प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करण्याची इच्छा आहे. तिने कंपनीकडेही याबाबत विचारणा केली आहे. आता ही महिला पुरुषांच्या उत्पादनासाठी काम कऱण्यासाठी उत्सुक का? यामागे एक धक्कादायक कारण आहे.
आपण एखाद्या जाहिरातीत झळकावं असं कुणाला वाटणार नाही. महिला असतील तर त्यांना ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करायला आवडेल. पण एका महिलेला मात्र ब्युटी नव्हे तर चक्क मेन्स प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करण्याची इच्छा आहे. तिने कंपनीकडेही याबाबत विचारणा केली आहे. आता ही महिला पुरुषांच्या उत्पादनासाठी काम कऱण्यासाठी उत्सुक का? यामागे एक धक्कादायक कारण आहे (Woman want men product ad).
सारे असं या महिलेचं नाव आहे. तिला पीसीओएस (PCOS) म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आजार आहे. ही एक हार्मोन्ससंबंधी समस्या आहे. यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. या आजारामुळे सारेच्या चेहऱ्यावर केस येतात. म्हणजे तिला पुरुषांसारखी दाढी येते. तिने वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त केस हटवण्यासाठी लेझर थेरेपीही घेतली. पण तिला काहीच फायदा झाला नाही. अखेर तिच्यासमोर रेझरचा वापर करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
गेल्या १२ वर्षांपासून ती शेव्हिंग करत आहे. त्यामुळे आता आपल्याला शेव्हिंगसंबंधी उत्पादनाची जाहिरात करायची आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. जिलेट कंपनीशी तिने याबाबत संपर्कही केला. पुढच्या रेझर जाहिरातीत आपला चेहरा घ्यावा अशी विनंती तिने केली.
टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करत सारे सांगते, आपल्याला गेल्या १२ वर्षांचा शेव्हिंगचा अनुभव आहे आणि ती जाहिरात आपल्यासाठी एकदम फीट राहिल. आपल्यासारखं कुणालातरी जाहिरातीत पाहून लोकांनाही बरं वाटेल. पुरुषांच्या प्रोडक्टसाठी जाहिरात करणारी ती पहिली महिला असेल, अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. द सनच्या रिपोर्टनुसार सारेच्या या इच्छेला अनेक महिलांनी सपोर्ट केला आहे. पीसीओएस पीडित महिलांसाठी तिने रेझरच्या जाहिरातीचं नेतृत्व करायला हवं, असं अनेक महिला युझर्सनी म्हटलं आहे.