एक्स बॉयफ्रेन्डला मारण्यासाठी पाठवलेलं विष टाकलेलं चिकन डिलीवरी बॉयच्या मुलाने खाल्ल, गमावला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:18 PM2021-05-07T12:18:32+5:302021-05-07T12:23:52+5:30

पोलिसांनुसार, नानीने हे चिकनचं पार्सल एका डिलेव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडे दिलं. ही घटना २५ एप्रिलची आहे. ४७ वर्षीय Bandiamn हे पार्सल टॉमीला देण्यासाठी निघाला होता.

Woman wanted to poisoned ex boyfriend with chicken killed delivery guy son in Indonesia- | एक्स बॉयफ्रेन्डला मारण्यासाठी पाठवलेलं विष टाकलेलं चिकन डिलीवरी बॉयच्या मुलाने खाल्ल, गमावला जीव...

एक्स बॉयफ्रेन्डला मारण्यासाठी पाठवलेलं विष टाकलेलं चिकन डिलीवरी बॉयच्या मुलाने खाल्ल, गमावला जीव...

Next

इंडोनेशियामध्ये सध्या एका केसची चांगलीच चर्चा रंगली आहे. इथे एका महिलेवर कथितपणे आऱोप आहे की, तिने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला जीवे मारण्यासाठी विष पाठवलं होतं. पण जी व्यक्ती डिलेव्हरी घेऊन गेली होती, त्या व्यक्तीच्या १० वर्षीय मुलाने ते चुकून खाल्लं आणि त्याचा मृत्यू झाला.

द सनच्या एका वृत्तानुसार, या महिलेचं नाव Nani Aprilliani Nurjaman असून ती २५ वर्षांची आहे. तिने तिचा एक्स बॉयफ्रेन्ड टॉनीला जीवे मारण्यासाठी सायनाइड टाकलेलं चिकन पार्सल पाठवलं होतं.

पोलिसांनुसार, नानीने हे चिकनचं पार्सल एका डिलेव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडे दिलं. ही घटना २५ एप्रिलची आहे. ४७ वर्षीय Bandiamn हे पार्सल टॉमीला देण्यासाठी निघाला होता.

Bandiman लोकेशनवर पोहोचला. तेव्हा टॉनीच्या पत्नीने दरवाजा उघडला. टॉनी घरी नव्हता. तो बाहेर गेला होता. त्यामुळे डिलेव्हरी करणारी व्यक्ती कन्फ्यूज झाली. कारण टॉनीच्या पत्नीने पार्सल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो हे पार्सल घरी घेऊन गेला. इफ्तारमध्ये त्याची पत्नी आणि १० वर्षीय मुलाने हे चिकन खाल्लं. 

काही वेळात दोघांनाही उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे डॉक्टर त्याच्या पत्नीला वाचवू शकले पण मुलाचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यातून समोर आलं की, नानी टॉनीवर रागावली होती कारण त्याने लग्न केलं होतं. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
 

Web Title: Woman wanted to poisoned ex boyfriend with chicken killed delivery guy son in Indonesia-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.