लसूण खाल्ला तर जाऊ शकतो 'या' महिलेचा जीव, कारण वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:58 PM2024-10-16T15:58:05+5:302024-10-16T16:00:51+5:30
Vampire Disease : अमेरिकेतील एका महिलेला एक अजब आजार झाला आहे. ज्याबाबत तुम्हालाही काहीच कल्पना नसेल.
Vampire Disease : जगभरात असे अनेक आजार आहेत, ज्यांबाबत लोकांना काहीच माहीत नसतं. काही आजार तर इतके अजब असतात की, ज्यांबाबत वाचल्यावर हैराण व्हायला होतं. अमेरिकेतील एका महिलेला असाच अजब आजार झाला आहे. ज्याबाबत तुम्हालाही काहीच कल्पना नसेल. या आजारामुळे महिलेने जर लसूण खाल्ला तर तिचा जीवही जाऊ शकतो.
अमेरिकेच्या मिनोसोटाची ३२ वर्षीय महिला फीनिक्स नायटिंगेलसोबत लसणाबाबत अशीच एक अजब कंडीशन आहे. या महिलेला ‘acute intermittent porphyria’ नावाचा दुर्मिळ आजार आहे. हा आजार एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ज्यात अंगदुखी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, उलटी यांसारखी लक्षणं दिसतात. या महिलेला या समस्या लसणामुळे होतात. या महिलेला सल्फरची एलर्जी आहे आणि लसणामध्ये भरपूर सल्फर असतं. जर तिने लसूण खाल्ला तर तिचा जीवही जाऊ शकतो.
काही रिपोर्टनुसार, या आजाराला वॅम्पायर डिजीज असंही म्हणतात. हा विचित्र आजार असलेली फीनिक्स दोन मुलांची आई आहे. फीनिक्स असं काहीच खाऊ शकत नाही, ज्यात सल्फर असतं. महिलेने सांगितलं की, लसणाची एक कळी खाऊन तिचा जाणार नाही. केवळ एलर्जी वाढेल. पण तिने जर नियमितपणे सल्फर असलेले पदार्थ खाल्ले तर तिचा जीव जाऊ शकतो.
फीनिक्सने सांगितलं की, आतापर्यंत तिला ४८० अटॅक येऊन गेलेत, ज्यात तिला उलटी झाली होती. गेल्यावर्षीच तिला या अजब आजाराबाबत तिला समजलं. तेव्हाच तिला हेही समजलं की, ती काय काय खाऊ शकत नाही. इतकंच नाही तर ती बाहेरचेही कोणते पदार्थ खाऊ शकत नाही. कारण बाहेरच्या जास्तीत जास्त पदार्थांमध्ये लसणाचा अधिक वापर केला जात असतो. आता ती तिच्या आजाराबाबत लोकांना माहिती देत आहे. जेणेकरून या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरावी.