धक्कादायक! मोबाइलवर दिवसरात्र चॅटींग करणं 'असं' पडलं महागात, याची कधी कल्पनाही केली नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:00 PM2020-07-22T15:00:48+5:302020-07-22T15:08:45+5:30

आयरलॅंडमध्ये राहणारी ३५ वर्षीय एमी लोरीने तिची स्टोरी लोकांसोबत शेअर केली. यात मोबाइलचा जास्त वापर केल्याने जे झालं ते तिने सांगितले आहे.

Woman who thought painful lumps were caused by texting loses hand | धक्कादायक! मोबाइलवर दिवसरात्र चॅटींग करणं 'असं' पडलं महागात, याची कधी कल्पनाही केली नसेल!

धक्कादायक! मोबाइलवर दिवसरात्र चॅटींग करणं 'असं' पडलं महागात, याची कधी कल्पनाही केली नसेल!

Next

आजकाल लोकांचा जास्तीत जास्त वेळ फोनवर जातो. मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेटण्याऐवजी लोक आता व्हर्चुअल पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात राहणे पसंत करतात. सध्या तर कोरोनामुळे हे प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. पण फोनवर इतका वेळ घालवून कुणी अपंग होत असल्याचं तुम्ही कधी ऐकलं का? नाही ना...पण आयरलॅंडमधून अशी एक घटना समोर आली आहे. या महिलेने कधी विचारही केला नसेल की, फोनचा जास्त वापर करून तिला हातही कापावा लागेल. फोनवर जास्त वेळ टाइप करत राहिल्याने या महिलेच्या हाताची अशी स्थिती झाली की, अखेर आपला जीव वाचवण्यासाठी तिला हात कापवा लागला. स्वत: या महिलेने लोकांना जागरूक करण्यासाठी तिची स्टोरी सर्वांसोबत शेअर केली आहे. 

आयरलॅंडमध्ये राहणारी ३५ वर्षीय एमी लोरीने तिची स्टोरी लोकांसोबत शेअर केली. यात मोबाइलचा जास्त वापर केल्याने जे झालं ते तिने सांगितले आहे. एमीने सांगितले की, नोव्हेंबर २०१८ मध्ये तिच्या असं लक्षात आलं की, तिच्या हातावर सूज आली आहे. तिला वाटलं की, जास्त फोन वापरल्याने असं झालं असेल. म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

एक वर्षापर्यंत तिच्या हातावर सूज राहिली. तेव्हा एमीने डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला घेतला. जेव्हा एमीची बायोप्सी करण्यात आली तेव्हा समजलं की, तिला कॅन्सर आहे. म्हणजे तिच्या हातावर आलेली सूज कॅन्सरमुळे आली होती. डॉक्टरने रिपोर्ट पाहून एमीला सांगितले की, कॅन्सर तिच्या हातातून संपूर्ण शरीरात पसरत आहे. त्यामुळे कॅन्सर रोखण्यासाठी हात कापावा लागेल. आपला जीव वाचवण्यासाठी एमीला हात कापावा लागला. 

एमी सांगते की, तो काळ फार कठिण होता. रोज सकाळी जेव्हा ती झोपेतून उठत होती तेव्हा कापलेला हात पाहून रडत होती. एमीने सांगितले की, सुरूवातीला ती आणि तिचा पती यावरून गंमत करत होते की, फोनवरून जास्त चॅटींग करून तिची अशी स्थिती झाली. पण दोघांनाही याची कल्पना नव्हती की, हे कॅन्सरचं लक्षण आहे.

एक वर्ष इग्नोर केल्यानंतर एमी डॉक्टरकडे हातातील सूज दुखत असल्यावर गेली होती. सुरूवातीला डॉक्टरही कन्फ्यूज होते की, फोड का होत आहेत. पण एमआरआयनंतर सर्जरीचा निर्णय घेण्यात आला. सर्जरीनंतर आता एमी प्रत्येक कामासाठी पतीवर अवलंबून आहे. मात्र, अशातही तिचा पती तिला साथ देतो आहे.

एमीने सांगितले की तिला फार मोठा धक्का बसला होता. यातून बाहेर येण्यासाठीही तिला फार वेळ लागला. पण आता हेच तिचं जीवन आहे. सोबतच तिने शरीरात आलेल्या कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिलाय. तिन सांगितले की, जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धक्कादायक! 27 वर्षीय तरूणीने रिकाम्या पोटी केलं मद्यसेवन, जागेवरच झाला मृत्यू

बोंबला! लॉकडाऊनमध्ये बटर चिकन खाण्यासाठी बाहेर पडणं पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला इतक्या लाखांचा दंड!

Web Title: Woman who thought painful lumps were caused by texting loses hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.