याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:23 PM2024-04-28T12:23:07+5:302024-04-28T12:24:16+5:30
एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने असा सल्ला दिला होता, जो ऐकल्यानंतर ती लखपती झाली.
कोणाचं नशीब कसं आणि कधी फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने असा सल्ला दिला होता, जो ऐकल्यानंतर ती लखपती झाली. तिने 50,000 डॉलर म्हणजेच जवळपास 41 लाख रुपय जिंकले आहे. या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तिला हे करायचं नव्हतं. पण बॉयफ्रेंडने अनेक वेळा सांगितलं, त्यानंतर तिने तिकीट विकत घेतले.
मुलीने 10 डॉलर म्हणजे 834 रुपयांना तिकिट खरेदी केलं होतं. ब्रिन असे या मुलीचं नाव आहे. ती अमेरिकेतील मेरीलँडची रहिवासी आहे. लकी ड्रॉ 20 एप्रिल रोजी झाला. मात्र मुलीला याबाबत माहितीच नव्हतं. सोमवारपर्यंत तिकीट तिच्या पर्समध्येच पडून होतं. लकी ड्रॉबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिने मेरीलँड लॉटरी एपवर स्कॅन केलं. मेरीलँड लॉटरीच्या रिलीझनुसार, ब्रिन घरी आली आणि तिचे तिकीट स्क्रॅच केलं.
मेरीलँड लॉटरी एपवर तिचं तिकीट अनेक वेळा तपासलं. तेव्हा तिला समजलं की तिने बक्षीस म्हणून मोठी रक्कम जिंकली आहे. ती म्हणाली की, "मी किंचाळत होते कारण माझा विश्वास बसत नव्हता. मी इतक्या जोरात ओरडले की मला वाटलं माझ्या शेजाऱ्यांना माझा आवाज ऐकू गेला. मला खूप आनंद झाला कारण जेव्हा तुम्ही जिंकण्याची अपेक्षा करत नाही आणि तसं काही घडतं. हे पैसे कसे खर्च करणार हे माहीत नाही."
ब्रिनने ट्रक खरेदी करून हा पैसा आपल्या व्यवसायात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील ही काही पहिलीच घटना नाही. अनेक लोकांनी लॉटरीमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पैसे जिंकले आहेत. गेल्या महिन्यात, न्यू जर्सी, यूएसए मधील एका व्यक्तीने 1.13 बिलियन डॉलरचा मेगा मिलियन्स जॅकपॉट जिंकला होता. त्यामुळे अशा घटना समोर आल्या आहेत.