108 वर्ष जुनी किडनी लावून आजही महिला आहे फीट, डॉक्टरही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:22 AM2024-01-20T11:22:46+5:302024-01-20T11:23:32+5:30
50 वर्षाआधी महिलेच्या आईने तिला किडनी दान केली होती. आजही ती काम करत आहे.
अवयव प्रत्यारोपण आजच्या काळात फार काही मोठी बाब नाही. पण डॉक्टरही हे मान्य करतात की, कोणताही प्रत्यारोपण केलेला अवयव 20-30 वर्षापेक्षा जास्त काळ चालू शकत नाही. यानंतर काहीना काही समस्या येणं सुरू होतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ब्रिटनमध्ये एका महिलेच्या शरीरात 108 वर्ष जुनी किडनी आहे. 50 वर्षाआधी महिलेच्या आईने तिला किडनी दान केली होती. आजही ती काम करत आहे. तिला कोणतीही समस्या नाही जे बघून डॉक्टरही हैराण झाले.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये राहणारी सू वेस्टहेड जेव्हा 12-13 वर्षांची होती तेव्हा तिला किडनीची समस्या झाली होती. त्याच वयात डायलिसिस सुरू करण्यात आलं आणि शेवटी 25 वयात तिची किडनी खराब झाली. डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तेव्हा आई मेटकाफने आपली एक किडनी तिला दान केली. जुलै 1973 मध्ये रॉयल व्हिक्टोरिया इन्फर्मरीमध्ये तिची सर्जरी झाली. जर आज तिची आई असती तर ती 108 वयाची असली असती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सू वेस्टहेडला तिच्या आईची किडनी प्रत्यारोपण करून 50 वर्ष झाली आहेत. आजही त्यांना काहीच समस्या नाही.
डॉक्टर हे बघून हैराण आहेत कारण त्यांचं मत आहे की, प्रत्यारोपण केवळ जास्तीत जास्त 20 वर्षे चालतं. दुसरीकडे सू वेस्टहेडने याला आईच्या वाढदिवसासारखं सेलिब्रेट करण्याची तयारी सुरू केली आहे. ती प्रत्यारोपणाची गोल्डन जुबली अॅनिवर्सरी साजरी करणार आहे. सू च्या आईचं 1985 मध्ये एका अपघातात निधन झालं होतं. वेस्टहेड म्हणाल्या की, जेव्हा माझं ट्रांसप्लांट झालं तेव्हा मी विचार केला की, मला पाच वर्ष जरी मिळाले तरी मी खूप भाग्यवान ठरेल. मात्र माझी आई आणि डॉक्टरांमुळे मी आज 50 वर्षांनंतरही जिवंत आहे आणि निरोगी आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
सू ने बीबीसीला सांगितलं की, माझ्या आईने मला खरंच मला जीवनदान दिलं आहे. कारण मी जास्त काळ जगू शकणार नव्हती जर तिने मला किडनी दिली नसती. मी चालूही शकत नव्हते. माझा रंग पिवळा झाला होता. पण प्रत्यारोपणानंतर अचानक माझ्यात बदल झाला. तुम्हीही तुमच्या कुटुंबियांना अवयव दान करू शकता.
सू वेस्टहेडचे डॉक्टर नेफ्रोलॉजिस्ट राचेल डेविसन म्हणाले की, आमची टेस्ट केल्या आणि ती पूर्णपणे बरी आहे. ही एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. यावरून हे स्पष्ट होतं की, प्रत्यारोपण एखाद्याला किती लांब आयुष्य देऊ शकतं.