दोन मुलांना घेऊन प्रियकराच्या लग्नात पोहोचली महिला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:42 AM2022-11-22T10:42:59+5:302022-11-22T10:45:26+5:30

Drama At Wedding Venue: इथे एका व्यक्तीचं लग्न होत होतं, तेव्हाच अचानक दोन मुलांना घेऊन महिला तिथे आली आणि तिने तिथे गोंधळ घातला.

Woman with two children reached to lover's marriage in Mohali | दोन मुलांना घेऊन प्रियकराच्या लग्नात पोहोचली महिला आणि मग...

दोन मुलांना घेऊन प्रियकराच्या लग्नात पोहोचली महिला आणि मग...

googlenewsNext

Drama At Wedding Venue:  भारतासहीत जगातील अनेक लग्नांमध्ये घडत असलेल्या  घटनांबाबत ऐकायला लोकांना खूप आवडतं आणि अनेक घटना तर सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. अशातच पंजाबच्या मोहालीतील एक अजब घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. इथे एका व्यक्तीचं लग्न होत होतं, तेव्हाच अचानक दोन मुलांना घेऊन महिला तिथे आली आणि तिने तिथे गोंधळ घातला.

ही घटना पंजाबच्या मोहालीतील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला पटियालाची राहणारी आहे. पण लग्न मोहालीमध्ये होणार होतं. सर्व पाहुणे आले होते आणि तेव्हाच अचानक मंडपात या महिलेने एंट्री केली. हैराण करणारी बाब म्हणजे महिला तिच्या दोन लहान मुलांसोबत तिथे आली. महिलेने दावा केला की, नवरदेवाचं तिच्यासोबत अफेअर सुरू आहे.

महिलेने केलेल्या या दाव्यामुळे उपस्थित सगळेच हैराण झाले. पटियालाला राहणारी महिला दोन मुलांची आई आहे. तिने दावा केला की, नवरदेव तिचा  प्रियकर आहे आणि ती त्याच्यासोबत 8 वर्षापासून राहत आहे. महिलेने हेही सांगितलं की, ती त्याच्यासोबत लग्न करणार होती आणि नवरदेवही तिच्यासोबत लग्न करण्यास तयार होता. पण आता तिला फसवून तो दुसरीसोबत लग्न करत आहे.

नंतर आला ट्विस्ट

महिलेच्या दाव्यानंतर लोकांनी नवरदेवाला याबाबत विचारलं. तो म्हणाला की, हे खरं आहे की, तो या महिलेला ओळखतो आणि त्याने तिला लग्नासाठी विचारणाही केली होती. पण दगा त्याने नाही तर महिलेने दिला आहे. ती तिच्या दोन मुलांना घेऊन पतीपासून वेगळी राहत होती. पण तिने तलाक घेतला नव्हता. लग्नासाठी विचारणा करूनही तिने तलाक घेतला नाही. सध्या नवरदेवाचं लग्न मोडलं आणि पोलीस चौकशी करत आहेत.
 

Web Title: Woman with two children reached to lover's marriage in Mohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.