एक, दोन नव्हे तर एकाच वेळी 16 कंपन्यांमध्ये काम करायची 'ती'; ऑफिसला न जाता घ्यायची पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:31 AM2023-09-08T10:31:20+5:302023-09-08T10:32:26+5:30

एकाच वेळी 16 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कधीच ऑफिसला गेली नाही.

woman working in 16 companies at once over 3 years china never went to work taking salaries | एक, दोन नव्हे तर एकाच वेळी 16 कंपन्यांमध्ये काम करायची 'ती'; ऑफिसला न जाता घ्यायची पगार

एक, दोन नव्हे तर एकाच वेळी 16 कंपन्यांमध्ये काम करायची 'ती'; ऑफिसला न जाता घ्यायची पगार

googlenewsNext

एका महिलेच्या फसवणुकीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ती एकाच वेळी 16 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कधीच ऑफिसला गेली नाही. ती भरपूर पैसे कमवत होती. जवळपास तीन वर्षे हे घडत होतं. ती इतकी श्रीमंत झाली की तिने एक बंगलाही विकत घेतला. मात्र आता पोलिसांनी तिला पकडलं आहे. गुआन यूई असं आरोपी महिलेचं नाव आहे. नोकरीच्या मुलाखतीदरम्यान ती पकडली गेली.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, गुआन नोकरीच्या मुलाखतीदरम्यान फोटो क्लिक करत होते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या चॅट ग्रुपवर तिने ते शेअर केले. तिने सर्व ग्रुपवर लिहिलं की ती क्लाइंट्ससोबत मीटिंग करत आहे. मात्र यावेळी तिची चोरी पकडली गेली. एकाच वेळी 16 नोकर्‍या करण्यासाठी, कंपनीचं नाव, नोकरी सुरू करण्याची तारीख, पोस्टचे नाव, सर्वत्र उपलब्ध पदे आणि पगाराची वेगवेगळी बँक खाती यांसारखी प्रत्येक तपशील तिच्याकडे लिहून ठेवला होता. ती एकाच वेळी अनेक कंपन्यांना फसवत होती. हे प्रकरण चीनचं आहे. 

गुआनसोबतच तिचा पती चेन कियांग याचाही या गुन्ह्यात सहभाग आहे. जानेवारी 2023 मध्ये एका कंपनीचे मालक लियु जियान यांना कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. ऑक्टोबर 2022 मध्ये, या कंपनीने टीम लीडरसह इतर सात लोकांना कामावर घेतलं. यामध्ये टीम लीडरचा पगार 20 हजार युआन होता. त्याच्या CV मध्ये नमूद केलेला कामाचा अनुभव खूपच चांगला होता. मात्र या लोकांना अपेक्षेप्रमाणे काम करता आले नाही. सर्वांसोबतचे कॉन्ट्रक्ट संपुष्टात आले.

लियू यांना प्रत्येकाच्या कागदपत्रांमध्ये तफावत दिसली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. चौकशी केली असता गुआनची अनेक बँक खाती असल्याचं आढळून आलं. पगाराच्या रूपात भरपूर पैसा येत आहे. तिची मोठी टोळी आहे, जी कंपन्यांना फसवून नोकऱ्या घेतात. हे लोक बनावट कागदपत्रे आणि आकर्षक सीव्हीच्या आधारे नोकरी मिळवतात. ते क्लायंटला भेटण्याचे निमित्त करून पगार घेत राहतात. शेवटी, कंपन्या नाराज होतात आणि त्यांना स्वतःहून काढून टाकतात. गुआनच्या ग्रुपमधील 53 जणांना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman working in 16 companies at once over 3 years china never went to work taking salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी