पहिली बेटी, धनाची पेटी! सकाळी मुलगी जन्मली, संध्याकाळी आई 80 लाखांची मालकीण झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 04:33 PM2022-12-03T16:33:29+5:302022-12-03T16:38:26+5:30

माझ्या मुलीमुळे माझं नशीब फळफळलं, ती आमच्यासाठी लकी चार्म ठरली. त्यामुळे मी तिची खूप आभारी आहे असं महिलेने म्हटलं आहे.

womans luck shines with birth of daughter became mistress of 80 lakhs | पहिली बेटी, धनाची पेटी! सकाळी मुलगी जन्मली, संध्याकाळी आई 80 लाखांची मालकीण झाली

पहिली बेटी, धनाची पेटी! सकाळी मुलगी जन्मली, संध्याकाळी आई 80 लाखांची मालकीण झाली

Next

कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. एका महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी ती तब्बल 80 लाखांची मालकीण झाल्याची घटना घडली आहे. माझ्या मुलीमुळे माझं नशीब फळफळलं, ती आमच्यासाठी लकी चार्म ठरली. त्यामुळे मी तिची खूप आभारी आहे असं महिलेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीनामध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव ब्रेंडा असं आहे. 

9 नोव्हेंबरला तिने सकाळी एका गोड मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी तिला लॉटरी लागली. बक्षीस म्हणून तिने जवळपास 80 लाख जिंकले आहेत. टॅक्स कापून तिला 53 लाख मिळतील. 30 नोव्हेंबरला ही रक्कम तिच्या अकाऊंटमध्ये आली आहे. त्यानंतर या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ब्रेंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "US Powerball Lottery Draw ची घोषणा झाली आणि मला फार आनंद झाला. अधिकाऱ्यांनी मला 80 लाखांची लॉटरी लागल्याचं सांगितलं."

"लॉटरी लागल्याचं समजताच माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सकाळी मुलीचा जन्म झाला आणि संध्याकाळी लॉटरी लागली त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला." जिंकलेल्या पैशातून आधी सर्व उधारी देणार आहे. त्यानंतर इतर कामांसाठी पैसे खर्च करेन असं म्हटलं आहे. तसेच ती नेहमी वाढदिवसाला लॉटरीचं तिकीट घेते पण तिला कधीच ते लागलं नाही आणि आता मुलीचा जन्म होताच लॉटरी लागल्याचं तिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: womans luck shines with birth of daughter became mistress of 80 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.