आधी तरूणींचे स्वीम सूट मोजत होते पोलीस, लहान कपड्यांवर लागत होता दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:39 PM2024-01-25T12:39:12+5:302024-01-25T12:39:45+5:30
आज तेच सांगणार आहोत जेव्हा स्विमिंग सूट घातल्यावर महिलांना तुरूंगाची शिक्षा होत होती.
हॉलिवूड असो वा बॉलिवूड आजकाल अभिनेत्री सहजपणे बिकीनी किंवा स्विमसूट घालताना दिसतात. वन वन पीस किंवा टू पीस बिकीनी तर कॉमन झाली आहे. पण एक असाही काळ होता जेव्हा परदेशात बिकीनीला चुकीचं मानलं जात होतं आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचं परिधान केल्यावर तरूणींना दंड भरावा लागत होता. आज तेच सांगणार आहोत जेव्हा स्विमिंग सूट घातल्यावर महिलांना तुरूंगाची शिक्षा होत होती.
रेअर हिस्टॉरिकल फोटोज आणि द वायरच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेसारख्या देशात स्वीमिंग सूट घालण्यावर अनेक बंधनं होती. न्यू जर्सीच्या अटलांटिक सिटीच्या बीचवर शर्ट न घातलेल्या पुरूषांवर बंदी होती. 1900 दरम्यान महिलांचे स्वीम सूट हाय नेक होते. बाह्या लांब असायच्या आणि पॅंटही असायची. हे स्वीमसूट उलनपासून तयार होत होते. ऑस्ट्रेलियन स्विमर आणि फिल्म सेलेब एनेट केलरमॅन (Annette Kellerman swimsuit arrest) ने जेव्हा वन-पीस स्विम सूट घातला तेव्हा तिला अमेरिकेतील अनेक बीचवर बॅन करण्यात आलं.
पोलीस मोजत होते स्वीमसूटची लांबी
1908 मध्ये को बॉस्टनच्या बिचवरून तिला अटक करण्यात आली होती. कारण तिच्या स्वीम सूटमधून तिचे हात, पाय, मान इत्यादी अवयव दिसत होते. 1922 दरम्यान अमेरिकेच्या शिकागोमध्ये पोलीस स्वीम सूटची लांबी मोजू लागले होते. कारण जसजसे नव्या कपड्यांचे मटेरिअल बनू लागले होते, स्वीम सूट जास्त टाइट आणि छोटे होऊ लागले होते. लांबी मोजल्यावरच महिलांना बीचवर येऊ दिलं जात होतं. जर स्वीम सूट लहान असेल त्यांना दंड भरावा लागत होता.
1920 च्या सुरूवातीला कोनी आयलॅंडच्या बिचवर सेंसर लावण्यात आलं होतं. म्हणजे पोलीस, पुरूष आणि महिला अंडरकव्हर होऊन बिचवर फिरत होते आणि लहान कपडे असलेल्या महिलांना पकडत होते. अमेरिकाच नाहीतर स्पेन, इटली आणि पोर्तुगालसारख्या देशांमध्येही बिकीनीवर बंदी होती. 1957 पर्यंत ज्या तरूणी बिचवर बिकीनी घालून दिसत होत्या त्यांना पोलीस दंड ठोठावत होते.