औषध समजून महिलेने गिळला Apple आयपॉड, पोटातून येऊ लागला होता आवाज...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 09:35 AM2022-11-16T09:35:02+5:302022-11-16T09:35:24+5:30
बोस्टनच्या एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला. तिने तिच्यासोबत झालेल्या या घटनेबाबत सांगितलं.
Apple Airpods: कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याची किंमत मोजावी लागते. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली. तिने औषध समजून तिचा अॅपलचा एअरपॉडचा एक भाग गिळला. पण तेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता. बोस्टनच्या एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला. तिने तिच्यासोबत झालेल्या या घटनेबाबत सांगितलं.
टिकटॉकवर @iamcarliiiib यूजरनेम असलेल्या महिलेने कथितपणे औषधाऐवजी तिचा एक AirPod गिळला. ही घटना एक वर्षाआधीची आहे. महिलेने सांगितलं की, तिला पेनकिलर इब्रुप्रोफेन घ्यायची होती. जी तिच्या हातात होती, तर दुसऱ्या हातात आयपॉडचा एक भाग होता. वेदना होत असताना तिने घाईघाईत औषधाजागी एअरपॉड गिळला. काही सेकंदात तिची चूक तिच्या लक्षात आली. तिने एअरपॉड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही यश आलं नाही. एक्स-रे काढल्यानंतर कंफर्म झालं की, एअरपॉड तिच्या पोटातच आहे.
महिलेच्या असंही लक्षात आलं की, एअरपॉड पोटातही व्हाइस रेकॉर्ड करण्यास सक्षम होता. कारण अजूनही तिच्या आयफोनसोबत कनेक्ट होता. एअरपॉडने पोटातील सगळं काही रेकॉर्ड केलं. आवाज ऐकून डॉक्टरही हैराण झाले. रेकॉर्डिंगमध्ये पोटातील आवाज येत होता. हे स्पष्ट झालं नाही की, एअरपॉडचा काही दुष्परिणाम झाला की नाही.