'अशा' पतींना पत्नी देतात दगा, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 02:40 PM2018-07-27T14:40:51+5:302018-07-27T14:41:57+5:30
जनरली असे म्हटले जाते की, महिला या पुरुषांच्या विरोधात उभ्या ठाकण्याच्या स्थितीत नसतात. पण आता परिस्थिती बदलली आहे.
एकेकाळी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये असे मानले गेले होते की, केवळ पुरुषच पत्नींना दगा देतात आणि महिला पीडित असतात. जनरली असे म्हटले जाते की, महिला या पुरुषांच्या विरोधात उभ्या ठाकण्याच्या स्थितीत नसतात. पण आता परिस्थिती बदलली आहे.
आता पूर्णपणे नाही पण बऱ्याच प्रमाणात पती-पत्नीच्या नात्यात समानता आली आहे असे म्हणता येईल. आता पत्नी किंवा महिला बाहेर जाऊन काम करू लागल्याने त्यांच्या घरातील कामात पुरूषांनीही हातभार लावणे अपेक्षित असतं. पण सगळेच पुरुष असं करताना दिसत नाहीत. मग अशा पुरूषांना जे महिलांना त्यांच्या घरातील कामात मदत करत नाहीत, त्यांना महिला दगा देण्यात जराही मागेपुढे पाहत नाहीत.
रिसर्चमधून खुलासा
फान्समध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार, जर एखादा पती पत्नीला घरातील कामात मदत करत नाही तर त्या महिला पतीला बिनधास्त दगा देतात. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असणार! पण हे भारतात होत नाही कारण भारतात तर घराची सगळी जबाबदारी ही महिलेवर असते. मग ती हाऊस वाइफ असो वा नोकरी करणारी असो.
फ्रान्समधील ग्लायडन नावाच्या एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग वेबसाइटने महिलांवर एक अभ्यास केला. या रिसर्च दरम्यान जास्तीत जास्त महिलांनी हे सांगितले की, पती घरातील काम जसे की टॉयलेट स्वच्छ करणे, वॉशिंग मशीन रिकामी करणे इत्यादी कामात हातभार लावत नसतील तर त्या त्यांना दगा देतात.