अरेरे! 2 मित्रांच्या बायका पडल्या एकमेकींच्या प्रेमात; नवऱ्यांना घटस्फोट देऊन शोधताहेत तिसरा पार्टनर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:32 PM2022-02-17T14:32:40+5:302022-02-17T14:42:08+5:30
सोशल मीडियावर दोन महिलांनीही आपली अनोखी लव्हस्टोरी शेअर केली आहे.
प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना चूक आणि बरोबर यातला नेमका फरकही कळत नाही असं म्हटलं जातं. प्रेमाला वयाचं, भाषेचं असं कोणतंही बंधनही नसतं. प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियावर दोन महिलांनीही आपली अनोखी लव्हस्टोरी शेअर केली आहे. एकमेकींना भेटण्याच्या आधी त्या दोघीही विवाहित होत्या. मात्र प्रेमात पडल्यानंतर दोघींनीही आपल्या पतीला घटस्फोट दिला. आता त्या आपल्यासाठी आता आणखी एक पार्टनर शोधत आहेत.
टोरी आणि सोल या दोघींनी आपली स्टोरी Consenting Adults नावाच्या पॉडकास्टवर शेअर केली. त्यांनी सांगितलं की दोघी पहिल्यांदा एका सोशल क्लबमध्ये भेटल्या होत्या. त्यावेळी दोघीही आपआपल्या पतीसोबत इथे आल्या होत्या. मात्र तेव्हा त्यांच्या मनात एकमेकींबद्दल तशी काही भावना नव्हती. दोघींचे पती मित्र होते. त्यामुळे या दोघींचीही चांगली मैत्री झाली. हळूहळू दोघींच्याही मनात एकमेकींसाठी फिलिंग येऊ लागल्या. परिणामी दोघीही भरपूर वेळ एकमेकींसोबत घालवू लागल्या. अखेर त्यांनी मान्य केलं, की त्यांचं एकमेकींवर खूप जास्त प्रेम आहे.
आपलं नातं मान्य केल्यानंतर टोरी आणि सोलने आपल्या पतींना घटस्फोट दिला. यानंतर दोघी सोबत राहू लागल्या. दोघींचंही एकमेकींवर खूप प्रेम आहे. मात्र या रोमँटिक नात्याला अधिक खास करण्यासाठी आता त्यांना एक पुरुष हवा आहे. टोरीने सांगितलं की त्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत, जो दोघींसोबत राहील. त्यांचं नातं अतिशय गुंतागुंतीचं आहे. आधी दोघींनाही वाटलं की त्या लेसबियन (Lesbian) आहेत. या कारणामुळे त्यांनी पतीला घटस्फोट दिला. मात्र सोबत राहिल्यानंतर त्यांना जाणवलं की दोघीही पुरुषांकडे आकर्षित होतात. याच कारणामुळे आता त्या पार्टनर शोधत आहेत.
आपल्या नवीन पार्टनरच्या शोधात दोघी अनेक कपल बेस्ड इव्हेंट्समध्ये जातात. तिथे आपल्याला हवा त्या व्यक्तीचा शोध घेतात. लोकांना या दोघींची स्टोरी अतिशय अजब वाटते. तर अनेकांनी दोघींना आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासही सांगितलं. लोकांनी कितीही टीका केली तर दोघींना काहीच फरक पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या एकमेकांसोबत खूश आहेत आणि आता एक पार्टनर शोधत आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.