अंधविश्वासाचा कहर! कथित भूताच्या नादात महिलेने गमावले ७३ लाख रूपये, मग पोलिसात घेतली धाव...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 09:50 AM2021-04-02T09:50:19+5:302021-04-02T09:54:42+5:30
या महिलेला इतर दोन महिलांनी हा विश्वास दिला होता की, तिच्यावर एका जिन किंवा भूताने ताबा मिळवला आहे.
कुवेतमधून एक अशी घटना समोर आली आहे जिथे एका महिलेने 'जिन'(एकप्रकारचा भूत) पासून सुटका मिळवण्यासाठी ३० हजार दीनार म्हणजे साधारण ७३ लाख रूपये गमावले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३७ वर्षीय या महिलेची ओळख सांगण्यात आलेली नाही.
या महिलेला इतर दोन महिलांनी हा विश्वास दिला होता की, तिच्यावर एका जिन किंवा भूताने ताबा मिळवला आहे. रिपोर्टनुसार, कथित जिनपासून सुटका मिळवण्यासाठी तंत्र-मंत्र करण्याच्या नावावर पीडित महिलेने ३० हजार दीनार गमावले आहेत.
महिलेने पोलिसांना काही कागदपत्रे दिली आहे. ज्यात २५,०८० दीनार बॅंक ट्रान्सफर आणि ४ हजार दीनार कॅश दिल्याबाबत सांगितले आहे. दोन्ही आरोपी महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. (हे पण वाचा : बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!)
भारतातही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. मध्य प्रदेशातील राजगढमध्ये भूत-प्रेतांपासून सुटका मिळवून देण्याचा दावा केला गेला होता. यासाठी व्यक्तीकडून पैसेही घेतले गेले होते. ३ महिन्यांपूर्वी राजगढ जिल्ह्यातील कुरावर नगरपासून ४ किलोमीटर दूर औद्योगिक क्षेत्रात पीलूखेडीमध्ये अंधविश्वासाचं अनोखं नाटक सुरू होतं. इथे महाराष्ट्रातून गेलेल्या एका बाबाने दरबार भरवला होता.
या भोंदू बाबाच्या दरबाराच्या आजूबाजूला शेकडो लोक व महिला एकत्र आल्या होत्या. त्यानंतर त्यांचं नाटक सुरू झालं होतं. या दरबारात सामिल होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ७५०० रूपये घेण्यात आले होते. पाच दिवसांच्या नाटकानंतर प्रशासनाला याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांच्या मदतीने भोंदू बाबाचा तंबू तेथून हलवण्यात आलाय. ज्यानंतर बाबा फरार झाला होता.