फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:08 AM2020-07-23T10:08:15+5:302020-07-23T10:14:32+5:30
प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच आली. कारण सॉफ्टवेअर तिचं सरनेम रिजेक्ट करत तिला स्लॅगचा वापर न करण्यासाठी सांगत होतं.
(Image Credit : indiaspend.com) (सांकेतिक छायाचित्र)
कोणत्याही व्यक्तीचा जन्म झाल्यावर त्या व्यक्तीला आई-वडील, परिवार किंवा समुदायाकडून सरनेम म्हणजेच आडनाव आपोआप मिळतं. पण आसामच्या एका महिलेसाठी तिचं सरनेम हे फारच अडचणीचं ठरत आहे. या महिलेला तिच्या वेगळ्या सरनेममुळे कुठेही नोकरी मिळत नाहीये. तिचा नोकरीसाठीचा अर्ज सरनेम पाहूनच फेटाळला जातो.
गुवाहाटीची राहणारी महिला प्रियंका सरकारी कंपनी नेशल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करत होती. पण सरनेम Chutia असं असल्याने वेबसाइट आणि सॉफ्टवेअर तिचा अर्जच रिजेक्ट करत होतं. पण तरी प्रियंका पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिली. प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच आली. कारण सॉफ्टवेअर तिचं सरनेम रिजेक्ट करत तिला स्लॅगचा वापर न करण्यासाठी सांगत होतं. हा सगळा प्रकार तिने आणि निराशा तिने फेसबुकवर व्यक्त केली. तिने लिहिले की, सरनेममुळे ती जिथेही इंटरव्ह्यूला जाते लोक तिचं नाव ऐकून हसतात.
प्रियंकाने फेसबुकवर लिहिले की, एका सरकारी कंपनीत तिचा नोकरीसाठीचा अर्ज पुन्हा पुन्हा यासाठी रिजेक्ट केला गेला. कारण तिचं जे सरनेम आहे ते वेबसाइट रिजेक्ट करत होती. तिने लिहिले की, 'मला दु:खं वाटत आहे आणि लोकांना सांगून थकले की, तिचं सरनेम कोणताही अपशब्द नाहीये. ती ज्या समुदायातून आली त्या समुदायाचं ते टायटल आहे. प्रियंकाने तिच्या समुदायातील लोकांना फालतूचा वाद सोडून या मुद्दयावर काम करण्याची विनंती केली.
दरम्यान खासगी स्तरावर तक्रार केल्यानंतर प्रियंका नोकरीचा अर्ज कंपनीने स्वीकारला आहे. आसाममध्ये एक आदिवासी जमात आहे ज्यांचं नाव Chutia आणि Sutiya असतं. आसाममध्ये राहणारा हा आदिवासी समुदाय मूळचा मंगोलियाच्या चीन-तिबेट परिवाराचे वंशज मानले जातात.
धक्कादायक! मोबाइलवर दिवसरात्र चॅटींग करणं 'असं' पडलं महागात, याची कधी कल्पनाही केली नसेल!