'झोपलेल्या पतीसोबत ठेवले संबंध, सकाळी उठल्यावर संतापला होता', स्वत: महिलेने केलं मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:48 PM2021-12-29T14:48:21+5:302021-12-29T14:50:54+5:30
'द सन' वेबसाइटने लोकांच्या पर्सनल गोष्टी जाणून घेण्यासाठी 'Dear Deidre' नावाने एका सीरिज सुरू केली. ज्यात लोक त्यांच्या जीवनातील यादगार क्षणांबाबत सांगत आहेत.
कोणत्याही लग्नात सहमती ही सर्वात महत्वाची बाब असते. पती-पत्नीत घरात निर्णय घेण्यासोबतच शारीरिक संबंध ठेवण्यासंबंधीही एकमेकांची सहमती गरजेची असते. दोघांचंही हे नातं सन्मान आणि सहमतीचं असलं पाहिजे. पण एका महिलेने सहमतीचं हे नातं तोडलं आणि पतीसोबत असं काही केलं की, वाचून हैराण व्हाल.
झोपलेल्या पतीसोबत ठेवले संबंध
'द सन' वेबसाइटने लोकांच्या पर्सनल गोष्टी जाणून घेण्यासाठी 'Dear Deidre' नावाने एका सीरिज सुरू केली. ज्यात लोक त्यांच्या जीवनातील यादगार क्षणांबाबत सांगत आहेत. या सीरिजमध्ये एका महिलेने सांगितलं की, एकदा तिने तिच्या झोपलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते आणि यामुळे तो फार नाराज झाला होता.
महिलेने सांगितलं की, आम्हा दोघांचं वय २८ वर्षे आहे आणि लग्नाला केवळ एकच वर्ष झालंय. माझे पती ऑफिसमधून आल्यावर फार थकलेला असतो आणि रोमान्स करण्यात काहीच इंटरेस्ट दाखवत नाही. एका दिवस महिलेला अजब अॅडव्हेंचर सुचलं आणि तिने पती झोपल्यानंतर त्याच्यासोबत संबंध ठेवले.
पतीने लावला रेपचा आरोप
आपली स्टोरी सांगताना महिला म्हणाली की, 'मी त्याला झोपेतून जागं केलं नाही कारण तो थकलेला होता आणि डोळे बंद करून होता. पण सकाळी जेव्हा महिलेने याबाबत पतीला सांगितलं तेव्हा तो फार रागावला होता. पण नंतर त्याने सहमती दिली. पण तो असंही म्हणाला की, गेल्या रात्री तू माझा रेप केला. कारण त्यावेळी माझी सहमती नव्हती.
पतीने असं म्हटल्यावर महिलेला जाणीव झाली की, तो बरोबर बोलत होता. कोणत्याही नात्यात सहमती सर्वात महत्वाची असते आणि तिने या कामासाठी पतीची सहमती घेतली नव्हती. पती म्हणाला की, जर तो तिची तक्रार घेऊन पोलिसात गेला तर ते माझीच साथ देतील. यानंतर महिलेला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तिने केलेल्या कृत्याच्या पश्चातापही झाला.
सहमती महत्वाची
महिलेच्या या कहाणीवर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, सहमती फार महत्वाची आहे आणि जर कुणी नशेत असेल, बेशुद्ध तर त्याच्यासोबत असं अजिबात करू नये. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, नशीब या महिलेचा पती तिच्या विरोधात पोलिसात गेला नाही. नाही तर ती अडचणीत सापडली असती.