कुत्र्यांना फिरवण्यासाठी सोडली नोकरी, आता महिन्याला कमावते लाखो रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 02:44 PM2024-01-27T14:44:49+5:302024-01-27T14:45:21+5:30
एका महिलेने कुत्र्यांना फिरणवण्याचा बिझनेस सुरू केला आणि त्यातून महिन्याला लाखो रूपये कमाई करते.
अनेकदा लोकांना तुम्ही त्यांचे पाळीव कुत्रे फिरायला नेताना बघत असाल. अनेकदा घरातील लोक त्यांना फिरायला नेतात तर कधी दुसरे लोक. पण हे दुसरे लोक त्यांना फिरायला नेण्याचे किती पैसे घेत असतील? या कामातून लाखो रूपये कमावले जाऊ शकतात. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका महिलेने कुत्र्यांना फिरणवण्याचा बिझनेस सुरू केला आणि त्यातून महिन्याला लाखो रूपये कमाई करते. केवळ तीन महिन्यात तिच्या कंपनीचा टर्नओवर 50 लाखांपेक्षा जास्त झाला आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, नॉर्विचमध्ये राहणारी 28 वर्षीय ग्रेस बटरी बरिस्ता कॉफी कॅफेमध्ये काम करत होती. इथे ती कॉफी बनवत होती. अनेक तास तिला काम करावं लागत होतं. पैसेही कामानुसार मिळत होते. बटरीचं कुत्र्यांवर खूप प्रेम होतं. एक दिवस तिच्या एका मित्राने सांगितलं की, तू तर कुत्र्यांना फिरवण्यात एक्सपर्ट झाली आहे. त्यांनाच फिरवण्याचं काम का करत नाही? इथून बटरीला आयडिया सुटली. तिने लगेच नोकरी सोडली.
ही घटना 2019 मधील आहे. ग्रेस बटरीने एक कंपनी सुरू केली. ती याद्वारे कुत्र्यांना फिरवण्याचं काम करत होती. दररोज सहा तास ती त्यांना फिरवत होती आणि या बदल्यात तिला कुत्र्यांच्या मालकांकडून पैसे मिळत होते. सुरूवातीला तिच्याकडे केवळ 4 कस्टमर होते, पण आता तिच्याकडे शेकडो कस्टमर आहेत. ती स्वत: 36 कुत्र्यांना फिरवते. यातून ती दरवर्षी 42 हजार पाउंड म्हणजे साधारण 44 लाख रूपये कमाई करते. सगळा खर्च जाऊन तिच्याकडे 34 लाख रूपये वाचतात.
बटरी म्हणाली की, कंपनीचा खर्च जास्त होतो कारण त्यांना स्टोर किंवा परिसरासाठी पैसे द्यावे लागतात. वीज, गॅससारख्या अनेक गोष्टी असतात. पण माझ्या कंपनीत असा काही खर्च नाही. माझा सगळ्यात जास्त खर्च पेट्रोलवर होतो.
ग्रेस सांगते की, डॉग वॉकरना आपल्या काही समस्या असतात. पण जर तुम्ही या कामावर प्रेम कराल. तर काही अडचण नाही. मला प्राण्यांवर प्रेम आहे. खासकरून कुत्र्यांवर. त्यामुळे मला हे काम आवडतं.