ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 02:29 PM2023-01-18T14:29:33+5:302023-01-18T14:30:20+5:30
Delhi Police Woman Constable : मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे.
Delhi Police Woman Constable : बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करतात. ते मेहनत करतात आणि हवं ते मिळवतात. पण हेच जर स्वप्न गावातील एका सामान्य मुलीचं असेल तर ते तिच्यासाठी फार जास्त अवघड होऊ बसतं. मात्र जिद्द असेल तर काहीही होऊ शकतं. अशीच एक घटना बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. तिच्याबाबत वाचून लोक आता तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे. दिल्लीला तरूणी तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता ही तरूणी दिल्लीत पोलीस कॉन्स्टेबल आहे. चार वर्षाआधी 2018 मध्ये तरूणीच्या वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण तरूणीने शिक्षण पूर्ण करून दिल्लीत पोलीस कॉन्स्टेबल बनून दाखवलं. यानंतर सगळेजण तिचं कौतुक करत आहेत.
2018 मध्ये तरूणीच्या वडिलांना तिचं लग्न करून द्यायचं होतं. कारण त्यांचा परिवार फार गरीब होता. त्यामुळे त्यांना वेळीच आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचं होतं. पण तरूणीला लग्न करायचं नव्हतं. आपली परिस्थिती बघता तिला काहीतरी करून दाखवायचं होतं. याच कारणाने ती घरातून पळून गेली आणि दिल्लीला राहू लागली. दिल्लीत राहून तिने खूप मेहनत घेतली आणि ती दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झाली. सध्या ती ट्रेनिंग घेत आहे.