लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:13 AM2021-06-08T10:13:48+5:302021-06-08T10:15:38+5:30

महिलांच्या वर्कआउटचे सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण अशाप्रकारे एका महिलेला सिलेंडरसोबत वर्कआउट करताना पहिल्यांदाच बघत असाल.

Women in red sari exercises with a gas cylinder viral instagram videos | लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल

लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

कोरोना महामारी दरम्यान फिजिकल फिटनेस फारच महत्वाचा आहे. याने शरीर तर फिट राहतच सोबतच मेंदूचाही व्यायाम होतो. तुम्हाला एनर्जी मिळते. हेच कारण आहे की, महामारी दरम्यान महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहेत. जिम बंद असल्याने अनेकजण घरीच व्यायाम करून फिट राहत आहे. सोशल मीडिया तुम्ही महिलांच्या वर्कआउटचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या एका महिलेची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण ही महिला गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. तेही साडी नेसून. तिचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

महिलांचे वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ही महिला साडी नेसून सिंलेडर उचलून वर्कआउट करत आहे. वेगवेगळ्या उपकरणांसोबत वर्कआउट करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल, पण अशाप्रकारे गॅस सिलेंडरचा वापर पहिल्यांदाच बघत असाल. 

कोरोना काळात जिम बंद आहेत. त्यामुळे अनेकांना जिममधील उपकरणांसोबत वर्कआउट करणं जमत नाहीये. अशात या महिलेने चांगली शक्कल लढवली आहे. ती गॅस सिलेंडरचा वापर करून वर्कआउट करते आणि स्वत:ला फिट ठेवते. या महिलेचं नाव Shaili Chikara असं आहे. ती स्वत:ला आर्टिस्ट आणि फिटनेस कन्सलटंट असल्याचं सांगते. शैलीचे इन्स्टाग्रामवर २ लाख ८८ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिची ही स्टाइल लोकांना चांगली पसंत पडत आहे. 
 

Web Title: Women in red sari exercises with a gas cylinder viral instagram videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.