बोंबला! 'नकली बेबी बंप' लावून प्रियकराच्या घरी पोहोचली तरूणी आणि पुढे जे झालं....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 10:20 AM2021-02-01T10:20:08+5:302021-02-01T10:30:15+5:30

जॅकलिनने प्रोस्थेटिक बेबी बंप तयार केलं आणि ते पोटावर फिक्स केलं. हे बेबी बंप लावून जॅकलिन ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. तेव्हा तिने तिचे काही फोटो एटकेनला पाठवले.

Women wore prosthetic fake baby bump ex lover and family | बोंबला! 'नकली बेबी बंप' लावून प्रियकराच्या घरी पोहोचली तरूणी आणि पुढे जे झालं....

बोंबला! 'नकली बेबी बंप' लावून प्रियकराच्या घरी पोहोचली तरूणी आणि पुढे जे झालं....

Next

प्रेमात पडलेले लोक अनेकदा आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी खोटं बोलतात. अनेक प्रकारच्या योजना बनवतात. असं सिनेमासोबतच खऱ्या आयुष्यातही होतं. पण कधी तुम्ही ऐकलं का की, प्रियकर मिळवण्यासाठी एका तरूणी नकली बेबी बंप लावलं. ही घटना स्कॉटलॅंडमधून समोर आली आहे. इथे एका तरूणीने ब्रेकअपनंतर प्रियकराला परत मिळवण्यासाठी हा सगळा खेळ रचला होता.

स्कॉटलॅंडच्या Dundee मध्ये ३५ वर्षीय जॅककिन मेकगॉवनचं ब्रेकअप २०१९ मध्ये झालं होतं. जॅकलिनचा प्रियकर जेमी एटकेन फार कमी काळ तिच्यासोबत राहिला आणि काही आठवड्यातच दोघे वेगळे झाले होते. पण हे ब्रेकअप जॅकलीनला मान्य नव्हतं. तिने एटकेनला परत मिळवण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन केला.

जॅकनिनने प्रोस्थेटिक बेबी बंप तयार केलं आणि ते पोटावर फिक्स केलं. हे बेबी बंप लावून जॅकलिन ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. तेव्हा तिने तिचे काही फोटो एटकेनला पाठवले. आणि मेसेजमध्ये लिहिले की, पाळणा घेण्यासाठी ३०० डॉलर पाठव. कारण हे तुझं बाळ आहे. त्यानंतर जॅकलिन एटकेन आणि त्याच्या आईलाही भेटली. जॅकलिनने नकली बेबी बंप दाखवून त्यांना पटवून दिलं की, ती एटकेनच्या बाळाची आई होणार आहे.

जॅकलिनने एटकेनच्या आईला सांगितले की, ती आजी होणार आहे. तिने अनेक स्कॅन अल्ट्रासाउंड आणि प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स एटकेनच्या आईला दाखवले. ज्यावर त्यांचाही विश्वास बसला की, जॅकलिन एटकेनच्या बाळाची आई होणार आहे. एकीकडे एटकेनची आई त्याच्यावर जॅकलिनकडे परतण्यासाठी दबाव टाकत होती आणि दुसरीकडे एटकेनचा संशय जॅकलिनवर वाढत होता.

कहर तर तेव्हा झाला जेव्हा ती नकली बेबी बंप लावून एक्स बॉयफ्रेन्ड एटकेनच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिने सर्वांसमोर एटकेनसोबत बाळाबाबत अनेक गोष्टी केल्या. जॅकलिन म्हणाली  की, ती बाळाला एटकेनचं नाव देणार नाही. पण एटकेनचे परिवारातील लोक त्याला घरातील सदस्य समजू शकतात. ते बाळाच्या सेरेमनीमध्येही येऊ शकतात. जॅकलिनने तर या खोट्या बाळाचं नावही घोषित केलं आहे नोआह. 

एटकेनने जॅकलिनवर नजर ठेवणं सुरू केलं आणि एक दिवस जॅकलिनचा भांडाफोड झाला. नंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आणि जॅकलिनवर एका परिवाराला प्रेग्नेन्सीच्या खोट्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप लागला. मात्र जॅकलिनला कठोर शिक्षा देण्यात आली नाही. कारण तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तिला सोशल सर्व्हिससाठी पाठवलं जाऊ शकतं. जॅकलिन कोर्टात म्हणाली की, तिला केवळ एटकेन परत हवा होता. त्यासाठी तिने हे प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं आणि त्याच्या परिवाराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
 

Web Title: Women wore prosthetic fake baby bump ex lover and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.