धक्कादायक! कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर महिलांना कापावी लागतात हाताची बोटं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 04:39 PM2021-11-01T16:39:03+5:302021-11-01T16:39:30+5:30

तुम्ही अनेकदा विचित्र प्रथांबाबत ऐकलं किंवा वाचलं असेल, पण ही प्रथा विचित्र आणि तेवढीच धक्कादायक आहे.

womens of this trib has to cut their fingers after death of family member | धक्कादायक! कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर महिलांना कापावी लागतात हाताची बोटं

धक्कादायक! कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर महिलांना कापावी लागतात हाताची बोटं

googlenewsNext

तुम्ही जगभरातील अनेक विचित्र प्रथा आणि परंपरांबद्दल ऐकलं असेल. काही परंपरा सामान्य असतात, तर काही अतिशय क्रुर किंवा भीतीदायक असतात. अनेक देशांनी आपापल्या देशातील अशाच प्रथांवर बंदी घातलेली आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रथेबद्दल सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. एका देशात अशी एक प्रथा आहे, ज्यात घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील महिलांना आपल्या हातांची बोटे कापावी लागतात. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. 

इंडोनेशियन परंपरा खूप धक्कादायक आहे
एका रिपोर्टनुसार, इंडोनेशियातील एका जमातीत घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर महिलांना आपली बोटे कापावी लागतात. news.com.au च्या वृत्तानुसार, दानी जमातीच्या महिलांना 'इकिपलिन' नावाच्या क्रुर प्रथेचा सामना करावा लागतो. त्यांना आपल्या हाताची बोटे कापावी लागतात. यात त्यांच्या बोटांचा वरचा भाग कापला जातो.

यामुळे कापतात बोटं
या जमातीमधील लोक मानतात की, महिलांनी बोटे कापल्याने अतृप्त आत्मा दूर राहते. तसेच, कुटुंबातील गेलेल्या व्यक्तीबद्दल दुःख दाखवण्यासाठीही ही प्रथा पाळली जाते. अजून धक्कादायक बाब म्हणजे, या जमातीमधील काही महिलांनी स्वतःसह आपल्या मुलांच्या हाताची बोटही कापली आहेत. 

या जमातीत किती लोक आहेत ?

2.5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली ही जमात पश्चिम न्यू गिनीच्या उंच आणि दाट जंगल भागात राहते. 1938 मध्ये जेव्हा अमेरिकन संशोधक रिचर्ड आर्कबोल्ड याने या भागात आले असता, त्यांना या जमातीबद्दल माहिती मिळाली. बोटे कापण्याच्या या प्रथेवर इंडोनेशियन सरकारने काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. पण, ही प्रथा अजूनही गुप्तपणे सुरू आहे.

Web Title: womens of this trib has to cut their fingers after death of family member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.