कॅन्सरग्रस्त महिलेचा कौतुकास्पद निर्णय, आयुष्य जगणार इतरांसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:42 PM2017-10-09T18:42:28+5:302017-10-09T18:49:42+5:30
उरलेला वेळ रडत किंवा उपचारांमध्ये वाया घालवण्यापेक्षा ज्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे अशा लोकांसोबत घालवण्याचा निश्चय तिने केला आहे.
वयाच्या ३५ व्या वर्षी दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेने तिचं उरलेलं आयुष्य इतर रुग्णांसाठी अर्पण करायचं ठरवलं आहे. तिला आपण आता या आजारातून वाचणार नाही, याची खात्री पटली आहे. आता तिच्या आयुष्यात फार कमी वेळ उरला आहे. पण हा उरलेला वेळ रडत किंवा उपचारांच्या विचारात वाया घालवण्यापेक्षा आजवर ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं, ज्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे अशा लोकांसोबत व्यतित करण्याचा निश्चय तिने केला आहे. यासाठी ती तिच्या दोन मुलांना आणि नवऱ्याला सोडायला तयार आहे.
अमेरिकेतील शॅरोन डोनले (४४) यांना डायजेस्टिव अर्थात पचनसंस्थेतचा कॅन्सर झाला आहे. तिचा उरलेलं आयुष्य इतरांसाठी खर्च करण्याचा हा निर्णय कित्येकांना पटलेला नाही. तिच्या या निर्णयामुळे तिच्या आारोग्यावर आणखी वाईट परिणाम होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर शॅरॉन म्हणाल्या ,‘घरात बसून आजाराशी लढत बसले तरी मला मृत्यू येणारच आहे. त्यापेक्षा जगात ज्यांना मायेची, प्रेमाची गरज आहे त्यांच्यासोबत मी माझं उर्वरित आयुष्य खर्ची केलं तर मला जगण्याची नवी उमेद मिळेल.’ तसंच आजारांशी सामना करण्यासाठी फक्त गोळ्यांची नाही तर मानसिक स्वास्थ्याचीही गरज असते ,असंही त्या पुढे म्हणाल्या.
हा निर्णय घेतल्यानंतर हॉस्पिटलच्या बाहेर पडताना त्यांनी सगळ्या स्टाफचे, नर्सचे मनापासून आभार मानले. नर्स ज्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात त्यापद्धतीने मलाही इतरांवर प्रेम करता यायला हवं. मी नर्सकडून फार प्रेरणा घेतली आहे. शॅरोन या व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा अनेकांशी संपर्क आला आहे. म्हणूनच इतरांशी संवाद कसा साधायचा, त्यांच्या समस्या कशा जाणून घ्यायच्या याची त्यांना चांगलीच जाणीव आहे.
त्यांचे पती केविन सांगतात की, ‘शॅरोन पूर्वीपासूनच फार डायट पाळायची. काय खायचं, किती खायचं या सगळ्याचं प्रमाण राखून ठेवायची. त्यामुळे तिला असा आजार होणं आमच्यासाठी धक्कादायकच होतं. तिला वयाच्या ३५ व्या वर्षीच पोटाच्या आजाराला सुरुवात झाली होती. पण १५ आठवड्यांनी तिच्या जठरात ट्युमर असल्याचं निप्षन्न झालं. हा आजार बरा होणाऱ्यांपैकी होता. पण तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कालांतराने आजार बळावला आणि तिच्या फुस्फुसात आणि हाडांवर चिकटला.’
फोटो सौजन्य- mirror.co.uk
ते पुढे म्हणाले, ‘डॉक्टरांचे उपचार सुरू असतानाही तिचा कॅन्सर आणखी वाढत जात गेला. आता तिच्या मानेवर आणि पाठीच्या कण्यावरही ट्यूमरने ताबा मिळवला आहे. हा वाढत जाणारा ट्यूमर तिलाही जाणवत होता. वेदनांमुळे तिला हा ट्यमुर एखाद्या जनांवरांसारखा वाटू लागलाय. पण तिच्या या आजारात तिनेच कूटुंबाला आधार दिला आहे. आम्ही तिला सावरण्याऐवजी प्रत्येकवेळी तिनेच आम्हाला सकारात्मक ऊर्जा दिली आहे.’
मृत्यू जवळ आला म्हणून नाही तर सुंदर आयुष्य जवळून बघण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचंही ते पुढे म्हणाले. शेरॉन यांच्या आयुष्यात फार कमी वेळ आहे. मात्र तो वेळ त्यांना इतर रुग्णांच्या सानिध्यात घालवायचा आहे. त्यांना दोन गोंडस मुलं आहेत. त्यांना या दोन मुलांचीही चिंता आहे. पण त्यांचे पती या मुलांचा योग्यरितीने सांभाळ करतील असा त्यांचा विश्वास आहे. म्हणून त्यांनी इतर गरजूंना मदत करायचं ठरवलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक रुग्णांना प्रोत्साहन मिळणार आहे.