OMG! संतापाच्या भरात ‘मिसाइल’सारखं हल्ला करते ‘हे’ झाड; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:33 AM2022-03-02T11:33:32+5:302022-03-02T11:34:06+5:30

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या झाडाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

Wood Sorrel plant explodes & goes ‘ballistic’ when touched | OMG! संतापाच्या भरात ‘मिसाइल’सारखं हल्ला करते ‘हे’ झाड; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

OMG! संतापाच्या भरात ‘मिसाइल’सारखं हल्ला करते ‘हे’ झाड; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Next

Wood Sorrel Plant: सध्या यूक्रेन-रशिया यांच्यात घमाशान युद्ध सुरू आहे. गेल्या ६ दिवसांपासून रशिया सातत्याने यूक्रेनवर मिसाइल हल्ले करत आहे. यूक्रेनच्या अनेक शहरात बॉम्बहल्ले होत आहेत. याचवेळी आम्ही तुम्हाला एका झाडाबद्दल माहिती सांगणार आहोत जे एका मिसाइलसारखंच हल्ला करतं आणि बॉम्बप्रमाणे त्याचा स्फोट होतो. ऐकूनही तुम्हाला आश्चर्य वाटलं ना. तुमच्यासारखं आम्हीही हैराण झालो जेव्हा या झाडाचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला.

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या झाडाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांना विश्वास बसणार नाही. हे झाड त्याचे लक्ष्य निश्चित करून त्यावर मिसाइल हल्ला करतं. या झाडाचं नाव वुड सोरेल असं आहे. हे झाड त्याला डिवचणाऱ्यावर हल्ला करतं आणि स्वत:चा बदला घेतं. वुड सोरेल प्लांट जेव्हा रागात असतं तेव्हा अशाप्रकारे कृती करते. या झाडाला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला राग येतो. त्यानंतर ते फटाफट ब्लास्ट करण्यास सुरुवात करतं.

कुणीही या झाडाला हात लावला तर या झाडाच्या बीया बॉम्ब बनून समोरच्यावर हल्ला करतं. हे विशेष झाड ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि मॅक्सिकोसारख्या देशात आढळतं. या झाडाचं प्रमाण कमी असलं तरीही बहुतांश देशात ते आढळतं. जेव्हा हे झाडातून बिया फेकल्या जातात त्या ४ मीटर दूर पर्यंत पडतात. झाड स्वत:मध्ये साठवून ठेवलेल्या ऊर्जेमुळे बीया ब्लास्ट होण्यास सक्षम असतात. या झाडाला कुणी हात लावला तर त्यावर ते तुटून पडतात. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.   

पाहा व्हिडीओ

Web Title: Wood Sorrel plant explodes & goes ‘ballistic’ when touched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.