डोळ्यांचं जगातलं सर्वात मोठं कलेक्शन, जाणून घ्या किती डोळ्यांचा आहे इथे संग्रह!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:01 PM2019-05-30T13:01:02+5:302019-05-30T13:06:35+5:30
डोळ्यांशी संबंधित वेगवेगळे आजार समजून घेण्यासाठी आणि संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डोळ्यांचं सर्वात मोठं कलेक्शन तयार केलं आहे.
(Image Credit : www.npr.org)
डोळ्यांशी संबंधित वेगवेगळे आजार समजून घेण्यासाठी आणि संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डोळ्यांचं सर्वात मोठं कलेक्शन तयार केलं आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ विसकॉन्सिन-मेडिसनमध्ये जनावरांच्या डोळ्यांचं सर्वात मोठं कलेक्शन आहे. लॅबमध्ये साधारण ५६ हजारांपेक्षा अधिक डोळ्यांचं कलेक्शन आहे. यातील ६ हजार नमूने अशा प्रजातींचे आहेत, ज्या कुठे आढळतात याची माहितीही मिळाली नाही.
कलेक्शन लॅबचे संस्थापक डिक डुबेलजिग म्हणाले की, दररोज इथे निदान डोळ्यांचे २० तरी नमूने आणले जातात. मी याआधी कधीही डोळ्यांच्या इतक्या मोठ्या संग्रहाबाबत ऐकलं नाहीये. लकरच ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करणार आहेत. जगभरातील अनेक दुर्मिळ जीवांचे डोळे या म्यूझिअममध्ये आहेत. लॅबमध्ये जास्तीत जास्त कुत्रे, मांजरी आणि घोड्यांचे डोळे आहेत. हे त्या लोकांकडून पाठवले जातात, ज्यांना त्यांना डोळ्यांशी संबंधित आजारांच्या उपचारात मदत करायची असते.
डिक डुबेलजिग यांचं म्हणणं आहे की, 'मला डोळ्यांशी जास्त जिव्हाळा आहे. कारण लहान असताना मला एका डोळ्याने कमी दिसत होतं'. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, वर्तमानात आम्ही झीका व्हायरसने प्रभावित झालेल्या जनावरांच्या डोळ्यांवर अभ्यास करणार आहोत.
काही दिवसांपूर्वीच वैज्ञानिकांना पहिल्यांदाच ओकापी(जिराफाची एक प्रजाती) चे डोळे मिळाले होते. न्यूयॉर्कच्या एका प्राणी संग्रहालयातून हे देण्यात आले होते. हा एक खासप्रकारचा जनावर असून जिराफसारखा दिसतो. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, सध्याच्या स्थितीत आमच्याकडे प्रत्येक प्रकारच्या जनावरांचे डोळे आहेत. तसेच कुत्र्यांचे जेवढे डोळे आहेत, त्यातील ५० टक्के असे आहेत, ज्यात हाय ब्लडप्रेशरमुळे ब्लीडिंग झालं होतं.
डोळे कसे ठेवतात सुरक्षित?
डोळ्यांचे नमूने मिळाल्यानंतर सर्वातआधी त्यांचे फोटो काढले जातात. नंतर त्यावर पॅराफीन मेण लावून स्टोर केले जातात. हे डोळे नंतर अशा बॉक्समध्ये ठेवतात, जे मायक्रोस्कोपने बघितल्यावर डोळ्यांची सगळी माहिती मिळते.