जगातील सर्वात मोठा ससा मालकाच्या घरातून गेला चोरीला; शोधणाऱ्यास मिळणार लाखोंच बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:48 AM2021-04-14T08:48:27+5:302021-04-14T08:51:57+5:30

हा जगातील सर्वात मोठा ससा आहे. त्याचं नाव डेरियस आहे. शनिवारी रात्री काही लोकांनी हा ससा चोरला होता.

World biggest rabbit in the world has been stolen from its home | जगातील सर्वात मोठा ससा मालकाच्या घरातून गेला चोरीला; शोधणाऱ्यास मिळणार लाखोंच बक्षिस

जगातील सर्वात मोठा ससा मालकाच्या घरातून गेला चोरीला; शोधणाऱ्यास मिळणार लाखोंच बक्षिस

googlenewsNext

जगातील सर्वात मोठा ससा त्याच्या मालकाच्या घरातून चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या सशाचं नाव गिनीज वर्ल्ड रिकोर्डमध्ये सर्वात मोठा ससा म्हणून नोंद आहे. या सशाच्या चोरी झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे सशाच्या मालकांनी सशाचा शोध घेणाऱ्याला बक्षिस जाहीर केले आहे. १२९ सेमी लांबीचा हा ससा त्याच्या मालकाच्या घरातून चोरी झाल्याची माहिती वेस्ट मर्सिया पोलिसांनी दिली आहे.

हा जगातील सर्वात मोठा ससा आहे. त्याचं नाव डेरियस आहे. शनिवारी रात्री काही लोकांनी हा ससा चोरला होता. २०१० मध्ये या सशाचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानित करण्यात आलं आहे. सशाचे मालक एनेट एडवर्ड्स यांनी चोराचा पत्ता आणि सशाला परत करणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. ज्या दिवशी हा ससा चोरीला गेला तो आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुख:द दिवस होता असं याच्या मालकांनी सांगितलं आहे.

एडवर्ड्स यांनी ट्विटरवरून लोकांनाही आवाहन केले आहे की, ज्या कुणी डेरियसला घेतले आहे त्याने परत द्यावे. आता तो ब्रीडिंगसाठी खूप वयस्कर झाला आहे. वेस्ट मर्सिया पोलिसांनी सशाच्या चोरीची पुष्टी करत हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्याचसोबत सशाची माहिती देण्याचं आवाहनही केले आहे. त्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाद्वीपमधील सर्वात मोठा ससा शनिवारी १० एप्रिल ते ११ एप्रिल रात्रीमध्ये चोरी झालेला आहे. त्यावेळी ससा मालकाच्या बागेतील एका झुडुपामागे बसला होता.  

Web Title: World biggest rabbit in the world has been stolen from its home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस