जगातल्या सर्वात मोठ्या बोटवर घर घेण्याची संधी, किंमत वाचून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:29 PM2021-06-30T12:29:51+5:302021-06-30T12:30:59+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, सोमनियोला तयार करण्यासाठी जवळपास ६ हजार मिलियन डॉलर्स म्हणजे ४४ अब्ज इतका खर्च येणार आहे.
जगातली सर्वात मोठी बोट बनवण्याचा काम जोरात सुरू आहे. या सुपरयाटमध्ये सहा फ्लोर्स असतील आणि ३९ अपार्टमेंट असतील. रिपोर्टनुसार, प्रत्येक अपार्टमेंटची किंमत जवळपास ११ मिलियन डॉलर्स म्हणजे ८१ कोटींच्या आसपास असू शकते. या ७२८ फूट लांब सुपरयाटचं नाव सोमनियो आहे. हे याट २०२४ मध्ये लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोमनियोला तयार करण्यासाठी जवळपास ६ हजार मिलियन डॉलर्स म्हणजे ४४ अब्ज इतका खर्च येणार आहे.
सध्या जगातली सर्वात मोठी सुपरयाट अज्जाम ही आहे. पण ही याट ६०० फूट लांब आहे. सोमनियाच्या माध्यमातून लोक जगाची सफर तर करू शकतीलच सोबतच त्यांना लक्झरी अपार्टमेंटमध्ये अनेक शानदार सुविधाही मिळतील. खास बाब ही आहे की लोक हे अपार्टमेंट तेव्हाच खरेदी करू शकतील जेव्हा हे खरेदी करण्याची ऑफर दिली जाईल. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये वेगळा जिम आहे. तसेच यात लायब्ररी, किचन आणि डायनिंग स्पेसही आहे.
हा प्रोजेक्ट कार्ल ले सोउफ हेच करत आहेत. ते सोमनियो ग्लोबलचे इन्चार्जही आहेत. सोमनियोसारखी मोठी बोटला स्वीडीश डिझाइन कंपनी टिलबर्ग डिझाइन आणि लंडन येथील कंपनी विंच डिझाइन यांनी मिळून तयार केलं आहे.
फायनॅन्शिअल टाइम्सनुसार, सोमनियोमध्ये अपार्टमेंट खरेदी करणाऱ्या लोकांना इथे वेगळा अनुभव तर मिळेलच, सोबतच अनेक वेगळ्या लोकांना भेटताही येणार. फायनॅन्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सोमनियो बोट नॉर्वेमध्ये तयार केली जाणार आहे आणि ऑफ प्लॅन सेलच्या माध्यमातून आर्थिक सहाय मिळणार आहे. ज्यातून या विशाल बोटचं कन्स्ट्रक्शनचं काम केलं जाऊ शकतं.