१८ कॅरेट सोन्याचा जगप्रसिद्ध कमोड चोरीला, किंमत वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:56 AM2019-09-16T10:56:25+5:302019-09-16T11:00:06+5:30
सकाळी-सकाळी ऑक्सफोर्डशायर ब्लेनहेम पॅलेसमधून चोरांनी शौचालय लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सकाळी-सकाळी ऑक्सफोर्डशायर ब्लेनहेम पॅलेसमधून चोरांनी शौचालय लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सामान्य कमोड नसून १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे. तर याची किंमत ५० लाख डॉलर म्हणजेच साधारण ३५.५ कोटी रूपये इतकी आहे.
थेम्स व्हॅली पोलिसांनुसार, 'एक टोळी ऑक्सफोर्डशायरमधील या पॅलेसमध्ये घुसली आणि हे कमोड त्यांनी पळवलं'.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सोन्याचा हा कमोड इटलीचे कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी तयार केला आहे. हा कमोड गुरूवारी सुरू करण्यात आलेल्या Victory is Not Option या प्रदर्शनाचा भाग होता.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना शनिवारी सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांनी हा सोन्याचा कमोड चोरी झाल्याची माहिती मिळाली. हा कमोड वापरला जात होता. अजूनही कमोड पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी एका ६६ वर्षीय व्यक्तीला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, ही चोरी होताना इमारतीचंही नुकसान झालं आहे. कारण कमोड काढल्यानंतर तिथे पाणी जमा झालं होतं. १८व्या शतकातील ब्लेनहेम पॅलेस वर्ल्ड हेरिटेज आहे. इथेच सर विंस्टन चर्चील यांचा जन्म झाला होता. सध्या हा पॅलेस बंद करण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी जेस मिलन यांनी सांगितले की, 'सोन्याचा चोरी गेलेला कमोड फार किंमती आहे. आम्हाला वाटतं ही चोरी करण्यासाठी चोरांनी दोन गाड्यांचा वापर केला असावा. कलाकृती अजून सापडलेली नाही. आम्ही चौकशी करत आहोत.
**UPDATE**
— Blenheim Palace (@BlenheimPalace) September 14, 2019
The Palace will now be shut for the rest of the day.
Further updates will follow.
ब्लेनहेम पॅलेसकडून एक ट्विट करून माहिती देण्यात आली की, पॅलेस दिवसभर बंद राहील आणि रविवारी खुलं केलं जाईल. दरम्यान २०१७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांना हा सोन्याचा कमोड देण्याचा विचार होता. 'अमेरिका' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कमोडला सर्वातआधी न्यूयॉर्क सिटीमध्ये २०१६ मध्ये गेगनहेममध्ये लोकांच्या समोर आणण्यात आलं होतं.