जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 09:55 AM2023-06-14T09:55:27+5:302023-06-14T11:07:25+5:30

Tunisian women free to marry non Muslim men: जगात असाही एक मुस्लिम देश आहे जिथे मुलींना कायदेशीरपणे दुसऱ्या धर्मातील मुलांसोबत लग्न करण्याचा अधिकार आहे. हा फार मोकळ्या विचारांचा देश आहे जिथे 99 टक्के लोक मुस्लिम आहेत.

World first islamic country where women can marry with non Muslims persons | जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार

जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार

googlenewsNext

(Image Credit - Global Citizen)

Tunisian women free to marry non Muslim men: जगात असे अनेक मुस्लिम देश आहेत जे आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. या देशांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे त्यांना मुस्लिम कायद्यानुसार वागावं लागतं. अशा देशांमध्ये मुलींना केवळ त्यांच्याच धर्मातील तरूणांसोबत लग्न करण्याची परवानगी असते. असं असलं तरी जगात असाही एक मुस्लिम देश आहे जिथे मुलींना कायदेशीरपणे दुसऱ्या धर्मातील मुलांसोबत लग्न करण्याचा अधिकार आहे. हा फार मोकळ्या विचारांचा देश आहे जिथे 99 टक्के लोक मुस्लिम आहेत.

हा देश म्हणजे ट्यूनीशिया आहे. जो आफ्रिकेच्या उत्तर भागात आहे. हा एक प्राचीन देश आहे आणि त्याचा इतिहासही समृद्ध आहे. आज हा देश जगातल्या इतर मुस्लिम देशांसाठी एक उदाहरण आहे. कारण आताच्या काळात येथील महिलांना पूर्ण इस्लामिक वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त स्वातंत्र्य आहे.

यात आपल्याला हेही मान्य करावं लागेल की, सगळ्या पवित्र इस्लामिक देश म्हणून प्रसिद्ध सौदी अरबचा क्राउन प्रिंसही त्यांच्या देशात हळूहळू महिलांना स्वातंत्र्य देत आहे. पण ट्यूनिशियामधील महिलांना आपल्या पसंतीने लग्न करण्याचा जो अधिकार आहे तो इतर इस्लामिक देशांच्या महिलांकडे नाही.

आधी या देशातही मुलींना दुसऱ्या धर्माच्या मुलांशी लग्न करण्यावर बंदी होती. पण काही वर्षाआधी उत्तर आफ्रिकेतील या देशात कायदा करून मुलींना हे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे की, ते इतर धर्माच्या मुलांचं धर्म परिवर्तन न करता त्यांच्यासोबत लग्न करू शकतात. असं मानलं जातं की, जगातल्या इतर मुस्लिम देशात जर एखादी मुस्लिम मुलगी दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत लग्न करत असेल तर आधी त्या मुलाला इस्लाम कबूल करावा लागतो.

'आफ्रिका डॉट कॉम' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ट्यूनीशियाने 1973 मध्ये लागू विवाह कायद्याविरोधात अनेक वर्ष आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत लग्न केलेल्या महिलांवर प्रतिबंध हटवण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बेजी कॅड एस्सेब्सी यांनी आश्वासन दिलं होतं त्यांनी ते पूर्ण केलं. 

दरम्यान एका कायद्याव्दारे महिलांना आपला साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या या निर्णयाचा कट्टरपंथियांनी आणि काही मुस्लिम मौलवींनी विरोध केला होता. ते म्हणाले होते की, सरकारचा हा निर्णय ट्यूनीशियाला इतर अरब जगापासून वेगळं करतो. कारण इतर देशांमध्ये मुस्लिम कायद्यांचं सक्तीने पालन केलं जातं.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ट्यूनीशियाने 1956 मध्येच बहुविवाह पद्धतीवर प्रतिबंध लावले होते. पण ही प्रथा आपल्या हिशोबाने पाळतात. तसेच इथे बलात्कार पीडितांसोबत आरोपी लग्न केल्यावर त्याची शिक्षा माफ केली जात होती. हा कायदाही रद्द करण्यात आला आहे. कारण अनेक रेपिस्ट पीडित महिलांसोबत लग्न करून शिक्षेपासून वाचत होते.

Web Title: World first islamic country where women can marry with non Muslims persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.