World's First SMS: जगात सर्वात पहिला SMS कोणता होता, तो कुणी कुणाला पाठवला होता माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:09 PM2023-03-09T14:09:37+5:302023-03-09T14:10:01+5:30

डिसेंबर महिन्यात एका खास कारणासाठी हा मेसेज पाठवला गेला होता

World First SMS Do you know what was the first message who sent it to whom read in detailed | World's First SMS: जगात सर्वात पहिला SMS कोणता होता, तो कुणी कुणाला पाठवला होता माहितीये का?

World's First SMS: जगात सर्वात पहिला SMS कोणता होता, तो कुणी कुणाला पाठवला होता माहितीये का?

googlenewsNext

World's First SMS: जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर टायपिंग आणि मेसेज पाठवण्यात व्यस्त असता, तेव्हा तुम्ही कधी हा विचार करता की हे सांर कसं सुरू झालं असेल? इतकंच नाही तर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की जगातील पहिला टेक्स्ट मेसेज कोणता होता? तो कोणी कोणाला पाठवला? याचं उत्तर आमच्याकडे आहे अन् आम्ही आज तुम्हाला याची माहिती देणार आहोत. पहिला SMS हा ख्रिसमसच्या (Christmas Party) महिन्यात पाठवण्यात आला होता आणि त्यामागेही एक छानशी कहाणी आहे.

ब्रिटिश प्रोग्रामरने पाठवला होता सर्वात पहिला SMS

31 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी लिहिलेला तो एक साधा पण आनंदाच्या निमित्ताचा एक संदेश पुढे क्रांती घडवून गेला. त्यावेळी तो संदेश म्हणजे SMS नील पापवर्थने (Neil Papworth) व्होडाफोनच्या नेटवर्कद्वारे लिहिला होता आणि व्होडाफोन कर्मचारी रिचर्ड जार्विसने ख्रिसमस पार्टीच्या वेळी पाठवला होता. त्या वेळी, 22 वर्षीय ब्रिटीश प्रोग्रामर नील पापवर्थने संगणकावरून पहिली लघु संदेश सेवा (Short Message Service) पाठविली आणि त्यानंतर आधुनिक SMS प्रकार सुरू झाला.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, 2017 मध्ये जेव्हा नील पापवर्थ यांना SMS बद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले होते की, '1992 मध्ये, मला कल्पना नव्हती की मजकूर पाठवणे (Texting) इतके लोकप्रिय होईल आणि यामुळे लाखो लोक वापरत असलेल्या इमोजी आणि मेसेजिंग Apps ना चांगले दिवस येतील.'

जगातील पहिल्या SMS वर लागली बोली!

ब्रिटिश टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने गेल्या वर्षी SMS चा लिलाव झाला होता. ऐतिहासिक मजकूर NFT म्हणून पुन्हा तयार केला गेला, जो डिजिटल पावती स्वरूपात आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, पॅरिसमधील अगुटच्या लिलावगृहाने प्रतिष्ठित मजकूर संदेशाचा लिलाव केला होता. या SMS साठी ज्याने बोली लावली त्याने मजकूर संदेशाच्या मूळ संप्रेषण प्रोटोकॉलच्या तपशीलवार आणि अद्वितीय प्रतिकृतीच्या वास्तविक मालकीचा एकमेव मालक आहे. खरेदीदाराने इथर क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे दिले होते.

Web Title: World First SMS Do you know what was the first message who sent it to whom read in detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.