हौसेला मोल नाही! बायकोचं स्वप्न पूर्ण करणार, थेट चंद्रावर घेऊन जाणार; जाणून घ्या, नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 11:42 AM2022-11-02T11:42:10+5:302022-11-02T11:44:42+5:30
एका व्यक्तीने हे खरं करून दाखवलं आहे. त्याने पत्नीसाठी तारे आणले नाहीत तर तो तिला आता पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणार आहे
मी तुझ्यासाठी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर नेईन... अशी अनेक वचनं ही प्रेमात हमखास दिली जातात. प्रत्यक्षात ही स्वप्नं साकार करणं शक्य नाही. पण एका व्यक्तीने हे खरं करून दाखवलं आहे. त्याने पत्नीसाठी तारे आणले नाहीत तर तो तिला आता पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणार आहे. तिला दिलेलं सुंदर वचन तो पूर्ण करणार आहे. चंद्रावर जाण्यासाठी त्याने दोन तिकीटही बुक केली आहेत.
डेनिस टिटो असं या व्यक्तीचं नाव असून ते अमेरिकेतील बिझनेसमन आहे. डेनिस जगातील पहिले स्पेस टुरिस्टही आहे. 2001 साली त्यांनी स्वतःच्या पैशाने अंतराळात फिरणारी पहिली व्यक्ती म्हणून रेकॉर्ड केला होता. रशियन स्पेसक्राफ्टमार्फत ते स्पेसमध्ये गेले होते. त्यावेळी रशियन स्पेस एजन्सीला पैशांची गरज होती आणि डेनिसने त्यांना 160 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेले होते.
डेनिस टिटो आता आपल्या पत्नीसह चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे. एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स स्पेस टुरिझमच्या तयारीत आहेत. याच मिशनचा भाग म्हणून डेनिस यांनी तिकीट बुक केले आहेत. स्पेसएक्सने स्टारशिप रॉकेटचा प्रोटोटाइम तयार केला आहे. ज्यातून डेनिस चंद्रावर जाणार आहे.
डेनिसने स्पेसएक्ससह ऑगस्ट 2021 मध्ये एक करार केला होता. त्यानुसार पुढील 5 वर्षांत त्यांना कधीही अंतराळ यात्रा करता येईल. दरम्यान स्पेसएक्सचे हे मिशन कधी सुरू होणार, याला किती खर्च येणार याबाबत अद्याप स्पेसएक्सने माहिती दिलेली नाही. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"