जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:32 PM2019-09-23T12:32:36+5:302019-09-23T12:38:48+5:30

लंडनमध्ये एक म्युझिअम सुरू होणार असून आतापासूनच त्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहेत. या म्युझिअमचं नाव आहे 'व्हजायना म्युझिअम'.

World first vagina museum to open in uk london | जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल!

जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल!

Next

लंडनमध्ये एक म्युझिअम सुरू होणार असून आतापासूनच त्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहेत. या म्युझिअमचं नाव आहे 'व्हजायना म्युझिअम'. हे जगभरातील सर्वात पहिलं असं म्युझिअम आहे. हे 16 नोव्हेंबरपासून सर्वांसाठी खुलं करण्यात येणार असल्याचे फाउंडर फ्लोरेंस शेक्टर हिने सांगितले. 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे म्युझिअम तयार करण्यासाठी जवळपसा 44 लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. हे पैसे म्युझिअमची फाउंडर फ्लोरेंसने क्राउडफंडिंगमार्फत जमवले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार करण्यात आला होता.

या म्युझिअमचं स्वतःच इन्स्टाग्राम अकाउंट आणि वेबसाइटही आहे. फ्लोरेंसने सांगितले की, म्युझिअमला लोकांमध्ये या प्रायवेट पार्टबाबत अनेक शंका-कुशंका आहेत. त्या दूर करण्यासाठी हे म्युझिअम खुलं करण्यात आलं आहे. 

पेनिस म्युझिअमबाबत ऐकल्यावर मनात आला विचार 

फाउंडर फ्लोरेंस यांनी म्युझिअम तयार करण्याबाबत 2017मध्ये विचार केला होता. तेव्हा त्यांना असं समजलं की, एक पेनिस म्युझिअम आइसलॅन्डमध्ये आहे. या म्युझिअमबाबत सर्व माहिती एकत्र केल्यानंतर फ्लोरेंसने महिलांबाबतही असं एखादं म्युझिअम असावं असा विचार केला. 

फ्लोरेंसने बोलताना सांगितले की, महिलाच्या या प्रायवेट पार्टबाबत अनेक लोक बोलताना फार विचार करतात. पण या म्युझिअममध्ये सर्व शंका-कुशंका दूर करण्यात येतील. तसेच याबाबत सर्व माहितीही उपलब्ध असेल.

Web Title: World first vagina museum to open in uk london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.