जगातील सगळ्यात मोठं कृष्ण मंदिर, याची खासियत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:51 PM2023-09-04T13:51:29+5:302023-09-04T13:54:02+5:30

World's Largest Lord Krishna Mandir : इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्सियसनेस म्हणजे इस्कॉन द्वारे हे मंदिर बांधण्यात आलं.

World largest lord krishna mandir in Kolkata Mayapur made in 800 crore rupees | जगातील सगळ्यात मोठं कृष्ण मंदिर, याची खासियत वाचून व्हाल अवाक्....

जगातील सगळ्यात मोठं कृष्ण मंदिर, याची खासियत वाचून व्हाल अवाक्....

googlenewsNext

World's Largest Lord Krishna Mandir : जगातील सगळ्यात मोठं कृष्ण मंदिर 12 एकर जमिनीवर बनवण्यात आलं आहे. सोबतच यात 45 एकरचं गार्डन आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्सियसनेस म्हणजे इस्कॉन द्वारे हे मंदिर बांधण्यात आलं.

जगातील सगळ्यात मोठं कृष्ण मंदिर कोलकातापासून 130 किलोमीटर अंतरावर नदिया जिल्ह्याच्या मायापूरमध्ये आहे. हे मंदिर बांधण्यासाठी अनेक वर्षे लागलीत. 2023 मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी फोर्टचे संस्थापक अल्फ्रेड फोर्ड या मंदिराचे चेअरमन आहेत. हे मंदिर सहा हजार स्क्वेअर फुटांपेक्षाही अधिक जागेत बनलं आहे. मंदिराची उंची 350 फूट आहे. 7 माळ्यांच्या या मंदिरात यूटिलिटी फ्लोर, टेंपल फ्लोर, पुजारी फ्लोरसोबत म्युझिअम फ्लोरही आहे.

मायापूरच्या या इस्कॉन मंदिराची एक मोठी खासियत म्हणजे यात जगातील सगळ्यात मोठं पुजारी फ्लोर आहे. जे 2.5 एकरात बनलं आहे. तिथे कीर्तन हॉल 1.5 एकरात बनवला आहे. ज्यात साधारण एकावेळी 10 हजार भाविक बसू शकतात.

या मंदिराची सुंदरता बघण्यासारखी आहे. तसं तर या मंदिराचं इंटेरिअर डिझाइन पाश्चिमात्या शैलीने केलं आहे. पण मंदिराचं वातावरण वैदिक संस्कृतीची जाणीव करून देतं.

असं सांगितलं जातं की, या मंदिराचं एकूण बजट 800 कोटी रूपये आहे. या मंदिरात एक टीचिंग टेम्पलही आहे. जिथे भगवत गीतेवर चर्चाही केली जाते.
 

Web Title: World largest lord krishna mandir in Kolkata Mayapur made in 800 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.