हा आहे जगातला सगळ्यात खतरनाक मासा, सायनाइडपेक्षा 1200 पटीने असतो विषारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:36 PM2022-11-26T12:36:25+5:302022-11-26T12:37:07+5:30
हा मासा सायनाइडपेक्षा 1,200 पटीने जास्त विषारी आहे. सायनाइड हे जगातील सगळ्यात खतरनाक विष मानलं जातं. हे खाल्ल्यावर काही सेकंदात व्यक्तीचा जीव जातो.
Mysterious Fish found Near Britain Sea: सामान्यपणे माश्यांना पौष्टिक आहार मानलं जातं आणि नॉनव्हेज खाणारे मासे खूप खातात. डॉक्टरही हे खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, काही मासे इतके खतरनाक असतात की, जे तुम्ही खाण्याबाबत तुम्ही कधी विचारही करू शकत नाही. हे मासे इतके खतरनाक असतात की, तुमचा जीवही जाऊ शकतो. ब्रिटनच्या समुद्र तटावर एक खतरनाक मासा सापडला आहे. हा मासा सायनाइडपेक्षा 1,200 पटीने जास्त विषारी आहे. सायनाइड हे जगातील सगळ्यात खतरनाक विष मानलं जातं. हे खाल्ल्यावर काही सेकंदात व्यक्तीचा जीव जातो.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या समुद्र तटावर एक Oceanic Puffer नावाचा मासा सापडला आहे. टेट्राओडोंटिडे प्रजातीचा हा मासा फारच खतरनाक आहे. हा मासा कॉन्स्टेंस मॉरिस यांना आढळून आला. ते त्यांच्या परिवारासोबत फिरत होते. तेव्हाच अचानक त्यांना किनाऱ्यावर हा मासा दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना Oceanic Puffer नावाचा मासा दिसला.
कॉन्स्टेंस मॉरिस यांनी हा मासा पाहिल्यावर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, या माश्याची लांबी 12 इंच आहे. त्याचे दात वेगळे होते. जे चोचेसारखे दिसत होते. माश्याचा चेहराही फार वेगळा होता.
एक्सपर्ट सांगतात की, या एकट्या माश्यात इतकं विष असतं की, 30 वयस्क लोकांचा जीव जाऊ शकतो. याच्या विषापासून वाचण्यासाठी कोणतं औषधही नाहीये. याच कारणामुळे या विषारी माश्यापासून दूर राहण्याचा आणि त्याला स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, हा मासा मोजक्याच वेळी किनाऱ्यावर येतो. तसा तो समुदात खोलवर राहतो.