या पाण्याच्या बॉटलच्या किंमतीत येईल महागडी ऑडी कार, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 04:13 PM2023-05-04T16:13:35+5:302023-05-04T16:15:06+5:30
Most Expensive Bottle : आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या एका अशा बॉटलबाबत सांगणार आहोत, जिची किंमत हजारो नाही तर लाखो रूपये आहे. चला जाणून घेऊ या बॉटलमध्ये असं काय आहे की, याची किंमत लाखो रूपये आहे.
Most Expensive Bottle : पाण्याची बॉटल आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनली आहे. घरात थंड पाणी असो वा ऑफिसला बॉटल घेऊन जाणं असो किंवा प्रवासात पाण्याची बॉटल ही असतेच. बाजारात प्लास्टिकपासून ते स्टील, तांब्याच्या बॉटल उपलब्ध असतात. यांची किंमत क्वालिटीनुसार, फार फार तर 100 ते 200 रूपये असते. पण आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या एका अशा बॉटलबाबत सांगणार आहोत, जिची किंमत हजारो नाही तर लाखो रूपये आहे. चला जाणून घेऊ या बॉटलमध्ये असं काय आहे की, याची किंमत लाखो रूपये आहे.
ही बॉटल इतकी महाग आहे की, किंमतीसाठी तिची नोंद गिनीज बुकमध्येही करण्यात आली आहे. एक्वा डि क्रिस्टॅलो ट्रिब्यूटो ए मॉडिग्लीयानो (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) नावाची ही बॉटल गेल्या 13 वर्षापासून जगातली सगळ्यात महागडी आणि फॅशनेबल वॉटल वॉटलच्या रूपात ओळखली जाते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बॉटलची नोंद 2010 पासून केली गेली आहे.
काय आहे इतकी महाग असण्याचं कारण...
या बॉटलमध्ये भरलेल्या पाण्याबाबत सांगायचं तर यात केवळ 750 एमएल पाणी भरलेलं असतं. ज्याची किंमत 50 लाख रूपये आहे. याचं कारण बॉटलची खास पॅकेजिंग आणि डिझाइनमुळे आहे. मुळात ही बॉटल 24 कॅरेट शुद्ध सोन्याने तयार केली आहे. यात भरलेल्या पाण्यात 5 ग्राम 24कॅरेट गोल्ड मिक्स केलं आहे. इतकंच नाही तर यात भरलेलं पाणी पृथ्वीवरील सगळ्यात शुद्ध पाणी आहे. हे पाणी आइसलॅंड, फिजी आणि फ्रान्सच्या ग्लेशिअरमधून आणण्यात आलं आहे.
डिझायनमुळे इतकी महाग
या बॉटलची डिझाइन जगभरात आपल्या क्लासिक डिझाइनसाठी प्रसिद्ध आर्टिस्ट फरनांडो अल्टमिरानो यांनी तयार केलं आहे. याच्या खास आणि क्लासिक डिझाइनमुळे 2010 मध्ये या बॉटलला एका लिलावात 60 हजार डॉलर म्हणजे 48.60 लाख रूपये बोली लागली होती. आपल्या डिझाइनसाठी या बॉटलला पुरस्कारही मिळाला होता.
जगात फक्त एकच पीस
ट्रिब्यूटो मोडिग्लियानी आपल्यासारखी जगातील एकच बॉटल आहे. ही गोल्डशिवाय प्लॅटिनम आणि हाय क्वालिटी डायमंडने तयार करण्यात आली आहे. ही बॉटल तयार करणारी कंपनी अल्टमिरानोने सामाजिक कार्यासाठी 5 लाख यूरो दान केले आहे.