बाप रे बाप! हे आहेत जगातले सर्वात महागडे हिरे, किंमत वाचून चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 12:38 PM2021-05-01T12:38:12+5:302021-05-01T12:40:41+5:30
जगात असे काही हिरे आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी-अब्जो रूपये आहे. अशाच पाच महागड्या हिऱ्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे हिरे महाग तर आहेतच सोबतच दुर्मीळही आहेत.
हिऱ्यांना रत्नात सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि त्यामुळेच यांची किंमत इतर रत्नांपेक्षा जास्त असते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात असे काही हिरे आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी-अब्जो रूपये आहे. अशाच पाच महागड्या हिऱ्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे हिरे महाग तर आहेतच सोबतच दुर्मीळही आहेत.
१४.८२ कॅरेटचा हा हिरा जगातला सर्वात मोठा नारंगी रंगाचा हिरा आहे. २०१३ मध्य जिनेव्हाच्या क्रिस्टी लिलाव संस्थेकडून याचा लिलाव करण्यात आला होता. ज्यात हा हिरा १५.६ प्रति कॅरेटच्या हिशेबाने विकला गेला होता. हा हिरा प्रति कॅरेटच्या हिशेबाने विकला जाणारा त्यावेळचा सर्वात महागडा हिरा होता.
जगातल्या सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या 'ग्राफ पिंक' हिऱ्याचा लिलाव २०१० मध्ये झाला होता. त्यावेळी हा हिरा ३०० कोटी रूपयांना विकला गेला होता. २७.७८ कॅरेटचा हा चमकदार गुलाबी हिरा ब्रिटनमधील लॉरेन्स ग्राफ नावाच्या व्यक्तीने खरेदी केला होता. त्यांच्याच नावावरून या हिऱ्याला ग्राफ पिंक असं नाव देण्यात आलं आहे.
'ब्लू मून' नावाचा हा हिरा २०१५ मध्ये ३१५ कोटी रूपयांना विकला गेला होता. एका अंगठीवर लावलेला हा हिरा हॉंगकॉंगमधील जोसेफ लू यांनी त्यांच्या मुलीसाठी खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी या हिऱ्याचं नाव त्यांच्या मुलीच्या नावावर ब्लू मून ऑफ जोसेफाइन ठेवलं होतं. हा हिरा १२.०३ कॅरेटचा आहे.
'पिंक स्टार' जगातल्या सर्वात दुर्मिळ हिऱ्यांपैकी एक आहे. ५९.६ कॅरेटचा हा हिरा अंड्याच्या आकाराचा आहे. २०१७ मध्ये हॉंगकॉंगमध्ये झालेल्या लिलावात हा गुलाबी हिरा रेकॉर्ड ब्रेक ४६२ कोटी रूपयांना विकला गेला होता. हा हिऱ्याला मिळालेल्या किंमतीचा वर्ल्ड रेकॉर्ड होता.
'ओपनहायमर ब्लू' हिराही दुर्मीळ हिऱ्यांपैकी एक आहे. १४.६२ कॅरेटच्या या हिऱ्याचा २०१६ मध्ये स्वित्झर्लॅंडच्या जिनेव्हात लिलाव करण्यात आला होता. या हिऱ्याला त्यावेळी ३२९ कोटी रूपये इतकी किंमत मिळाली होती.