तुम्ही जगातील सर्वात महागडं आइसक्रीम खाल्लंय का? एका स्कूपची किंमत सोन्यापेक्षाही महाग, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:35 PM2021-07-21T12:35:50+5:302021-07-21T12:37:13+5:30
जगातील सर्वात महागडं आइसक्रीम कोणतं असा जरा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
आइसक्रीम म्हटलं की क्वचितच असं कुणी असेल की ज्याच्या जीभेला पाणी सुटणार नाही. मग तो ऋतू कोणताही असो आइसक्रीम खाण्याची इच्छा अनेकांना आवरत नाही. आइसक्रीम हे एक असं डेजर्ट आहे की भलेभले लोक हवं त्या किमतीचं आइसक्रीम खरेदी करण्याची तयारी ठेवतात. पण जगातील सर्वात महागडं आइसक्रीम कोणतं असा जरा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. (World most expensive ice cream costs rs 60000 sold in dubai scoopi cafe)
एका अहवालानुसार दुबईतील 'स्कूपी कॅफे'मधील 'ब्लॅक डायमंड' नावाचं आइसक्रीम जगातील सर्वात महाग आइसक्रीम म्हणून ओळखलं जातं. ज्याच्या एका स्कूपची किंमत जवळपास ८४० डॉलर म्हणजेच ६२ हजार ९०० रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे सध्या २२ कॅरेट सोन्याची एका तोळ्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.
नेमकं या आइसक्रीममध्ये आहे तरी काय?
ब्लॅक डायमंड या आइसक्रीममध्ये इटालियन टफल्स, एम्ब्रोसियल इराणी केसर आणि खाण्यायोग्य २३ कॅरेट सोन्याचा मुलामा हे जिन्नस वापरले जातात. ताज्या वेनिला बीन्सच्या सहाय्यानं हे आइसस्क्रीम तयार केलं जातं आणि तेही तुमच्या डोळ्यासमोर तयार केलं जातं. ब्लॅक डायमंड आइसक्रीम एका स्पेशल कपमध्ये दिलं जातं. या आइसक्रीमला काळ्या किंवा सुवर्ण रंगाच्या स्पेशल Versace Bowl मध्ये दिलं जातं.
दुबईच्या ज्या कॅफेमध्ये हे महागडं आइसक्रीम दिलं जातं. तिथंच २३ कॅरेट खाण्यायोग्य सोन्यानं बनवलेली गोल्ड कॉफी देखील मिळते.