जगातला सगळ्यात महागडा पेन पाहिला का? जाणून घ्या याची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:11 AM2023-09-04T10:11:20+5:302023-09-04T10:14:25+5:30
Expensive Items : तुम्हाला अशा एका पेनाबाबत माहीत आहे का जो खरेदी करण्यासाठी लाखो रूपये नाहीतर कोट्यावधी खर्च करावे लागतात. चला जाणून घेऊ या पेनची खासियत.
Expensive Items : पेनच्या अनेक प्रकारांबाबत तुम्ही ऐकलं असेल. 5 रूपयांपासून 200 ते 300 रूपयाला पेन मिळतात. पण तुम्हाला अशा एका पेनाबाबत माहीत आहे का जो खरेदी करण्यासाठी लाखो रूपये नाहीतर कोट्यावधी खर्च करावे लागतात. चला जाणून घेऊ या पेनची खासियत.
जगातील सगळ्यात महागात पेन किती रूपयांचा आहे?
जगात बऱ्याच प्रकारचे पेन आहेत. या लिस्टमध्ये फुलगोर नॉक्टर्नस नावाच्या एका पेनाचाही समावेश आहे. या पेनाची किंमत 8 मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय करन्सीमध्ये ही किंमत जवळपास 60 कोटी रूपये इतकी होते.
2010 मध्ये शांघायमध्ये एका लिलावादरम्यान हा पेन 8 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आला होता. हा पेन तयार करण्यासाठी सोनं आणि काळ्या हिऱ्यांचा वापर केला गेला.
बोहेम रॉयल पेन
लक्झरी पेन निर्माता कंपनी मोंटब्लॅकचा बोहेम रॉयल पेन आपल्या जास्त किंमतीसाठी ओळखला जातो. हा पेन 18 कॅरेट पांढऱ्या सोन्याने तयार करण्यात आला आहे आणि याच्या वरच्या भागावर हिरे जडण्यात आले आहेत. या पेनाची किंमत 1.5 मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय करन्सीनुसार जवळपास 8 कोटी रूपये.
का इतके महागडे फोन खरेदी करतात लोक?
बऱ्याच लोकांना काहीना काही कलेक्ट करण्याची आणि खरेदी करण्याची आवड असते. असे बरेच लोक असतात, जे वेगवेगळे पेन आपल्या कलेक्शनमध्ये ठेवतात. जगातील सगळ्यात महागड्या पेनला खरेदी करणं म्हणजे एखादी अॅंटीक वस्तू खरेदी करण्यासारखं आहे. याच कारणाने श्रीमंत लोक कोट्यावधी रूपये देऊन ते खरेदी करतात.