वेगळं दिसण्यासाठी कायपण! शरीरावर १५० टॅटू आणि ४० बॉडी मॉडिफिकेशन्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:50 PM2019-05-18T16:50:19+5:302019-05-18T16:54:03+5:30
जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. आपली वेगळ ओळख निर्माण करण्यासाठी लोक अनेक विचित्र गोष्टी करतात.
जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. आपली वेगळ ओळख निर्माण करण्यासाठी लोक अनेक विचित्र गोष्टी करतात. असंच काहीसं एक व्यक्तीने केलं. त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संपूर्ण शरीरावप टॅटू काढून घेतले. त्याने त्याच्या शरीराच्या काही भागावर नाही तर संपूर्ण शरीराव टॅटू काढले आहेत. इतकेच नाही तर त्याने शरीराचं बॉडी मॉडिफिकेशन देखील करून घेतलं.
इथन ब्रॅंबल असं या व्यक्तीचं नाव असून आतापर्यंत सर्वात जास्त टॅटू काढण्याचा रेकॉर्ड यूकेतील क्रिस डलजेल यांच्याकडे होता. त्याने शरीरावर ६०० टॅटू काढले होते. आणि यासाठी त्याने ३८ हजार पाऊंड खर्च केले होते. त्याचे चेहऱ्यावर आणि डोळ्यातही टॅटू काढले.
पण इथन ब्रॅंबल एक अशी व्यक्ती आहे ज्याने क्रिसचा रेकॉर्ड मोडला आहे. इथनला आता वर्ल्ड मोस्ट मोडिफाइड यूथ म्हटलं जात आहे. २२ वर्षीय इथन ब्रॅंबलने आपल्या शरीरावर केवळ १५० टॅटू काढले आहेत आणि ४० पेक्षा जास्त बॉडी मोडिफिकेशन केले आहेत.
त्याने त्याची जिभ सुद्धा दोन भागात विभागली आहे. तर कानांची छिद्रे मोठी केली आहेत. इतकेच नाही तर त्याने हातांमध्ये सिलिकॉन स्पायडरही टाकून घेतले आहेत.
इथनने सांगितले की, या सगळ्यात जिभेचं मॉडिफिकेशन सर्वात कठीण काम होतं. असं केल्यानंतर त्याला सीरिंजच्या माध्यमातून पाणी प्यावं लागलं. कारण त्यावेळी त्याला दोन भागात विभागलेल्या जिभेला बॅलन्स करणं येत नव्हतं.
इथन सांगतो की, मला नेहमीच नवनवीन लूक्स करणं आवडतं. जसजसा मी मोठा होत गेलो, मी माझ्या नाकात पियर्सिंग केलं. मला हे सगळं फार चांगलं वाटत गेलं. नंतर विचार केला की, मी असेच काही बॉडी मॉडिफिकेशन केले पाहिजे.