जगातील सर्वात घातक विषाचा खुलासा, रशियाने दुश्मनांवर वापर केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:37 AM2022-05-30T11:37:56+5:302022-05-30T11:38:21+5:30

World painful poison: 'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, रशियन व्हिसलब्लोअर अलेक्झेंडर पेरेपिलिचनी लंडनमध्ये स्ट्राइकिनप्रमाणे एका रासायनिक पदार्थासोबत मृत आढळले होते.

World most painful poison strychnine used by Russian in sickening death | जगातील सर्वात घातक विषाचा खुलासा, रशियाने दुश्मनांवर वापर केल्याचा दावा

जगातील सर्वात घातक विषाचा खुलासा, रशियाने दुश्मनांवर वापर केल्याचा दावा

Next

Painful Poison Strychnine: जगातल्या सर्वात खतरनाक विषाबाबत खुलासा झाला आहे. तज्ज्ञांनी याला आतापर्यंतचं सर्वात वेदनादायी पदार्थांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. याची लक्षणं इतकी खराब आहेत की, मांसपेशींमध्ये कंपन झाल्यावर हाडांपासून मांस वेगळं होतं आणि त्याआधी इंद्रिय वाढतात. या विषाला स्ट्रायकिन नाव दिलं आहे. पावडरच्या रूपात मिळणाऱ्या या विषाचा वापर रशिया आपल्या दुश्मनांसाठी करतो.

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, रशियन व्हिसलब्लोअर अलेक्झेंडर पेरेपिलिचनी लंडनमध्ये स्ट्राइकिनप्रमाणे एका रासायनिक पदार्थासोबत मृत आढळले होते. यासाठी केलेल्या अनेक टेस्टमध्ये स्ट्राइकिन घेण्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाही. मानवी शरीरावर याच्या भयावह प्रभावमुळे ब्रिटनमध्ये या गंभीर रसायनावर बंदी घालण्यात आली आहे.

विष तज्ज्ञ डॉ. नील ब्रॅडबरी म्हणाले की, एक वाईट गोष्ट ही आहे की, हे विष फार हळूवार काम करणारं विष आहे आणि मृत्यू होण्याला काही तास लागतात. हे फार वेदनादायी आहे. दुर्दैवाने याचा प्रभाव इंद्रिय वाढवण्यातही आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माहीत असतं की, काहीतरी भयावह होत आहे. 

ते म्हणाले की, कल्पना करा की, तुमच्या शरीराच प्रत्येक मांसपेशी प्रसरण पावते. कधी कधी प्रसरण इतकं मजबूत होतं की, मांसपेशी हाडांपासून मांस वेगळं करतात. डॉ. ब्रॅडबरी ज्यांच्याकडे बायोकेमिस्ट्री आणि मेडिकल बायोकेमिस्ट्रीमध्ये डिग्री आहे. आणि त्यांनी ए टेस्ट फॉर पॉयजन -  इलेवन डेडली सब्सटेंस अॅड द किलर हू यूज देम' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.  ज्यात सांगितलं आहे की, हे विष गिळलं जाऊ शकतं.

ते म्हणाले की, एक बाब जी मला फारच इंटरेस्टींग वाटते ती ही की, माजी केजीबी डबल एजंट अलेक्झेंडर लिट्विनेंकोच्या चहाच्या कपात देण्यात आलेलं पोलोनियम. हे आश्चर्यजनक आहे की, लोकांनी विषाला लपवण्यासाठी काय वापरलं. स्ट्रायकिनच्या भयावह प्रभावानंतरही काही वर्षाआधी हे स्टॅमिना वाढवणारं औषध म्हणून दिलं गेलं होतं.
 

Web Title: World most painful poison strychnine used by Russian in sickening death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.