जगातल्या नंबर वन टेबल टेनिस प्लेअरची महिला फॅनने चोरी केली अंडरविअर आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:27 IST2023-04-11T15:26:49+5:302023-04-11T15:27:54+5:30
ही घटना तेव्हा घडली जेव्हा तो हॉटेलच्या रूममध्ये होता आणि एक महिला फॅन जबरदस्ती रूममध्ये घुसली होती.

जगातल्या नंबर वन टेबल टेनिस प्लेअरची महिला फॅनने चोरी केली अंडरविअर आणि....
World No One TT Player: खेळाडू किंवा स्टार लोकांचे फॅन्स अनेकदा अजब गोष्टी करतात. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे जगातील नंबर एकचा टेबल टेनिस खेळाडू फॅन जेडोंगसोबत अजब प्रकार घडला. झालं असं की, एका हॉटेलच्या रूममधून या खेळाडूची अंडरविअर चोरीला गेली आहे. याबाबत त्याने एका महिला फॅनवर आरोप केला आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा तो हॉटेलच्या रूममध्ये होता आणि एक महिला फॅन जबरदस्ती रूममध्ये घुसली होती. ती आली आणि त्याची अंडरविअर घेऊन गायब झाली. यानंतर त्याने पोलिसांना याची सूचना दिली.
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या राजधानीतील एका हॉटेलमध्ये घडली. इथे जगातील नंबर एक टेबल टेनिस खेळाडू फॅन जेडोंगच्या हॉटेलच्या रूममध्ये एक महिला फॅन घुसल्याचा आणि कथितपणे तिने त्याची अंडरविअर चोरी केल्याचा आरोप आहे. तसेच खेळाडूने सोशल मीडिया साइट वीबोवर एक पोस्टही लिहिली. ज्यात त्याने सांगितलं की, ती महिला अनेक दिवसांपासून त्याचा पाठलाग करत होती.
त्याने पुढे लिहिलं की, 6 एप्रिलच्या सकाळी ती हॉटेलच्या रिसेप्शनमधून चावीचं कार्ड घेऊन अनेकदा त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये घुसली. त्याने असंही सांगितलं की, हे हॉटेलमधील सफाई कर्मचारी आणि सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्ध होऊ शकतं. महिला त्याच्या रूममध्ये आली होती आणि ती अंडरविअर चोरू करून फरार झाली. त्याने फॅन्सना विनंती केली आहे की, असे प्रकार करू नये.
जेडोंगने पुढे लिहिलं की, या घटनेमुळे मला फार वाईट वाटलं आहे. आता मी फॅन्ससोबत न बोलण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच त्याने बीजिंगच्या पोलिसांना याची सूचना दिली. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये अंडरविअर चोरी करणारी महिला पकडली गेल्याचाही उल्लेख नाही. सध्या चौकशी सुरू आहे.