टायटॅनिकपेक्षा दुप्पट; जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा भारतात शेवट, पण का? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:34 PM2024-01-19T15:34:55+5:302024-01-19T15:35:51+5:30
अनेक वर्षे समुद्रावर राज्य करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा गुजरातमध्ये शेवट झाला.
Worlds Biggest Ship: आज जगभरात एकापेक्षा एक अवाढव्य जहाजे आहेत. पण, 1912 मध्ये 'टायटॅनिक' जगातील सर्वात मोठे जहाज होते. त्याची लांबी सुमारे 882 फूट होती. पण हे जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले आणि या अपघातात सुमारे 1500 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर अनेकवर्षे मोठी प्रवासी जहाजे पाहायला मिळाली नाही. पण, मोठ्या आकाराची मालवाहू जहाजे बांधली जात होती. आज आम्ही अशाच एका जहाजाबद्दल सांगणार आहोत, जे टायटॅनिकच्या जवळपास दुप्पट लांबीचे होते. विशेष म्हणजे, त्या जहाजाचा शेवट भारतात झाला.
जपानने 1979 मध्ये एक अवाढव्य जहाज तयार केले होते. 30 वर्षे समुद्रावर राज्य केल्यानंतर हे जहाज भारतातील गुजरातमध्ये मरण पावले, म्हणजेच त्याचा शेवट झाला. जपानच्या सुमितोमो हेवी इंडस्ट्रीजने 1974-1979 दरम्यान या जाहाजाची निर्मिती केली होती. 'Seawise Giant' असे या महाकाय जहाजाचे नाव होते. सुरुवातीपासूनच जहाज अनेक वादांशी संबंधित होते.
The Jahre Viking built in 1979 was the largest ship ever made. It was scrapped in 2010. pic.twitter.com/DbOc7RTao8
— Historic Vids (@historyinmemes) January 18, 2024
मालकाने ते घेण्यास नकार दिला
या जहाजाच्या नशिबात पहिल्यापासून वेदना लिहिल्या होत्या. हे जहाज जपानच्या ओप्पामा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आले, परंतु त्याच्या ग्रीक मालकाने ते घेण्यास नकार दिला. नंतर चीनच्या सी.वाय. तुंगने हे विकत घेतले. या जहाजाला ‘जहारे वायकिंग’ या नावाने सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. याची लांबी सुमारे 1500 फूट होती. ते प्रामुख्याने तेल टँकरच्या वाहतुकीसाठी वापरले जात असे. 1988 मध्ये कच्च्या तेलाची वाहतूक करत असताना सद्दाम हुसेनच्या हवाई दलाने त्यावर हल्ला केला.
गुजरातमध्ये झाला शेवट
नंतर याची दुरुस्ती करण्यात आली आणि 1991 मध्ये नॉर्वेजियन कंपनीला विकले. त्यावेळी हे जगातील सर्वात मोठे जहाज होते. सुमारे 30 वर्षे समुद्रावर राज्य केल्यानंतर ते 2009 मध्ये गुजरातमध्ये पोहोचले. येथे हे जहाज जगातील सर्वात मोठ्या शिप ब्रेकिंग यार्डांपैकी एक असलेल्या 'अलंग'मध्ये उतरवण्यात आले. हे जहाज तोडण्यासाठी वर्षभरात सुमारे 1000 मजूर लागले. या जहाजाचा नांगर सुमारे 36 टन होता. जगातील सर्वात मोठे जहाज असणे हा त्याच्यासाठी शाप ठरला. हे जहाज जगातील अनेक प्रमुख व्यापारी मार्ग पार करू शकले नाही. यात पनामा कालवा, सुएझ कालवा आणि इंग्लिश चॅनेलचा समावेश आहे. यामुळेच अखेर या जहाजाला तोडण्यात आले.