खरं की काय? ६५ वर्षांपासून या माणसानं एकदाही अंघोळ नाही केली; कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:53 PM2021-01-18T12:53:12+5:302021-01-18T13:04:04+5:30

अमोऊ हाजी या माणसानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या  ६५ वर्षांपासून या माणसानं अंघोळ केलेली नाही.

Worlds dirtiest man amou haji, know a reason | खरं की काय? ६५ वर्षांपासून या माणसानं एकदाही अंघोळ नाही केली; कारण वाचून व्हाल अवाक्

खरं की काय? ६५ वर्षांपासून या माणसानं एकदाही अंघोळ नाही केली; कारण वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

आतापर्यंत तुम्ही अनेक आश्चर्यकारक फॅशन्स पाहिल्या असतील. जगात एक व्यक्ती अशीसुद्धा आहे. जिने अंघोळ न करण्याचा रेकॉर्ड केला आहे. या माणसाबाबत वाचून तुम्हीही चकीत व्हाल. कारण  ६५ वर्षांपासून या माणसानं आंघोळ केलेली नाही. इराणचा रहिवासी असलेल्या अमोऊ हाजी या माणसानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या  ६५ वर्षांपासून या माणसानं अंघोळ केलेली नाही. अमोऊ हाजी यांनी असं का केलं , त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अंघोळ न करण्यामागचं कारण

८३ वर्षीय अमोऊने  ६५ वर्षांपासून आपल्या शरीरावर पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही. कारण  त्याला पाण्याची खूप भीती वाटते. आंघोळ केली तर आपण आजारी पडू असा त्याचा समज आहे. अमोऊ  कधीही आपली कोणतीही वस्तू स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवत नाही कारण स्वच्छ आणि साफ वस्तूंची अमोऊला खूप चीड येते. त्याच्यामते घाणेरडेपणा त्याला या वयातसुद्धा निरोगी आणि धष्ट, पुष्ट ठेवतो. 'घाणेरडेपणामुळेच मी इतके आयुष्य जगू शकलो'. असं तो म्हणतो. अनेकदा अस्वच्छतेच्या कारणांवरून त्याला गावाबाहेर राहावं लागलं. गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो

असा आहे आहार

घाणेरडेपणा, अस्वच्छतेचा रेकॉर्ड करणाऱ्या अमोऊचा आहारसुद्धा असाच आहे. अमोऊला एक्सिडेंट किंवा नैसर्गिक पद्धतीने मेलेल्या प्राण्यांचे मास खायला आवडते. त्याला मासांहार जास्त प्रिय आहे. याशिवाय खराब झालेल्या भाज्या इतर पदार्थ अमोऊला आवडतात. घरात बनवलेले चविष्ट जेवण अमोऊला आवडत नाही. 

निवारा

अमोऊच्या घराचा काहीही ठिकाणा नाही. गावापासून लांब जमिनीत बनलेल्या खड्ड्यांमध्ये राहायला अमोऊला आवडतं. गावातील लोकांनी अमोऊसाठी एक झोपडी बनवली आहे. त्या झोपडीत अमोऊ कधीतरी राहतो. मातीमध्ये राहायला अमोऊला आवडतं. विशेष म्हणजे  घाणेरडेपणामुळे अमोऊला कोणतंही इन्फेक्शन होत नाही.  गावातील लोक गावाबाहेर त्याला भेटण्यासाठी येतात. अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

Web Title: Worlds dirtiest man amou haji, know a reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.