इथे आढळतात जगातले सर्वात मोठ्या आकाराचे बेडूक, रिसर्चमधून आश्चर्यकारक गोष्टी समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 12:45 PM2019-08-15T12:45:38+5:302019-08-15T12:49:08+5:30

सामान्यपणे भारतात पावसाळ्यात आढळणारे पिवळे बेडूक हेच आपण सर्वात वजनदार आणि आकाराने मोठे मानतो.

Worlds largest frog Goliath lives in African countries, Which weigh up to 3 kilograms | इथे आढळतात जगातले सर्वात मोठ्या आकाराचे बेडूक, रिसर्चमधून आश्चर्यकारक गोष्टी समोर

इथे आढळतात जगातले सर्वात मोठ्या आकाराचे बेडूक, रिसर्चमधून आश्चर्यकारक गोष्टी समोर

googlenewsNext

(All Image Credit : Social media)

सामान्यपणे भारतात पावसाळ्यात आढळणारे पिवळे बेडूक हेच आपण सर्वात वजनदार आणि आकाराने मोठे मानतो. हे बेडूक साधारण एक किलो वजनाचे असावेत. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, बेडकाचं वजन तीन किलोंपेक्षा जास्त असू शकतं. आणि या बेडकांची गणती जगातल्या सर्वात मोठ्या बेडकांमध्ये केली जाते. पण हे बेडूक भारतात नाही तर आफ्रिकेत आढळतात.

जगातल्या सर्वात मोठ्या बेडकाच्या प्रजातीचं नाव गोलियश असं आहे. बर्लिनच्या नॅच्युरल हिस्ट्री म्युझिअम द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमधून या बेडकांबाबत अनेक आश्चर्यकारक खुलासे झाले आहेत.

अभ्यासकांनुसार, गोलियथ बेडकं हे त्यांच्या राहण्यासाठी एका छोट्या तलावाची स्वत:च निर्मिती करतात. हे त्यांच्या व्यवहाराची खासियत आहे. कधी कधी ते तलावाच्या निर्माणासाठी चक्क दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे दगड सुद्धा हटवतात.

या एका बेडकाचं वजन ३.३ किलोपर्यंत आणि लांबी ३४ सेंटीमीटर म्हणजे १३ इंचपर्यंत असते. अभ्यासक मार्विन शेफ यांच्यानुसार, हा बेडून फार मोठे आणि वजनदार तर असतातच सोबतच आपल्या पिलांची काळजीही खास पद्धतीने घेतात. हे ज्या तलावात राहतात, त्या पाण्यात फेस तयार करतात, जेणेकरून जनावरांनी यांच्या पिलांना नुकसान पोहोचवू नये.

गोलियथ बेडकांची ही प्रजाती आफ्रिकी देश कॅमरून आणि इक्वेटोरिअल गिनीमध्ये आढळते. दक्षिण आफ्रिकेत एम्पुला नदीच्या किनाऱ्यावर या बेडकांची संख्या फार जास्त आहे. अभ्यासकांनी २२ अशा जागांचा शोध लावला, जिथे या बेडकांची अंडी असतात. यातील अनेक जागांवर साधारण २७०० ते २८०० अंडी असतात.

Web Title: Worlds largest frog Goliath lives in African countries, Which weigh up to 3 kilograms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.