जगातील रेल्वेचा सगळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास, १३ देश फिरवते ही रेल्वे; जाणून घ्या भाडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:46 PM2024-11-25T14:46:41+5:302024-11-25T14:47:10+5:30
तुम्हीही अनेकदा असा प्रवास केला असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वेबाबत सांगणार आहोत. जी १३ देश फिरवते.
World Longest Train Journey: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं पसरलं आहे. रोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. जवळच्या ठिकाणांवर काही तासांमध्ये रेल्वे पोहोचवते. तर दूर असलेल्या ठिकाणांवर एका दिवसानंतर, दोन दिवसानंतर किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनंतर पोहोचवलं जातं. यादरम्यान अनेक राज्य, शहरं पार करत रेल्वे प्रवास करत असते. तुम्हीही अनेकदा असा प्रवास केला असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वेबाबत सांगणार आहोत. जी १३ देश फिरवते.
मिररच्या रिपोर्टनुसार, पोतुर्गाल ते सिंगापूरपर्यंत चालणाऱ्या रेल्वेचा हा जगातील सगळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास आहे. रस्त्यात ही रेल्वे १३ देशांवरून जाते. या रेल्वेला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल २१ दिवस लागतात. म्हणजे एकदा तुम्ही रेल्वेत बसले तर २१ दिवस वेगवेगळ्या देशांचा आनंद घेऊ शकता. प्रवासादरम्यान ही रेल्वे ११ ठिकाणांवर थांबते.
18,755 किलोमीटरचं अंतर पार करणारी ही रेल्वे पोर्तुगालच्या अल्ग्रेनीहून सुरू होऊन स्पेन, फ्रान्स, रशिया, चीन, व्हिएतनाम, थायलॅंडहून सिंगापूरला पोहोचते. रस्त्याही ही रेल्वे पॅरिस, मॉस्को, बीजिंग, बॅंकॉकसारख्या शहरांहूनही जाते. या प्रवासादरम्यान जगातील अनेक शहरांच्या सौंदर्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
अनेकदा लोकांना असं वाटतं की, इतका लांब प्रवास करणारी रेल्वे आहे म्हणून याचं भाडंही जास्त राहील. पण असं अजिबात नाहीये. या रेल्वेचं भाडं १३५० अमेरिकन डॉलर आहे. भारतीय रूपयांमध्ये 1,13,988.98 रूपये होते. म्हणजे यूरोप ते आशियाचा प्रवास केवळ 1 लाख रूपयात.
या रेल्वेची तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला खाण्या-पिण्याचंही काही टेंशन नाही. रेल्वेत सगळ्या गोष्टींची सोय असते. जर तुम्हाला या रेल्वेने प्रवास करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आवश्यक कागदपत्रे, सीट, दोन रेल्वेमधील कनेक्शन हे सगळं चेक केलं पाहिजे.