हे आहे जगातील सर्वात भाग्यवान घर, कारण वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:35 PM2021-09-25T16:35:21+5:302021-09-25T16:36:11+5:30
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, ला पाल्माच्या अटालांटिक महाद्वीपावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर मोठ्या प्रमाणात लाव्हारस निघत होता.
स्पेनच्या डोंगरांमध्ये असलेल्या एका घराला जगातील सर्वात 'भाग्यशाली घर' म्हटलं जात आहे. याचं कारण आहे की, ज्वालामुखीच्या स्फोटानंतर बाहेर येणाऱ्या लाव्हारसापासून हे सुरक्षित होतं. खवळत्या लाव्हारसात आजूबाजची प्रत्येक गोष्ट जळून राख झाली. मात्र, हे छोटसं घर आश्चर्यकारकपणे सुरक्षित राहिलं. स्पेनमधील लोक याला चमत्कार मानत आहेत. घराच्या मालकालाही मोठा आनंद झाला आहे.
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, ला पाल्माच्या अटालांटिक महाद्वीपावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर मोठ्या प्रमाणात लाव्हारस निघत होता. यानंतर प्रशासनाने ला पाल्मा येथील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. लोक जीव वाचवण्यासाठी आपलं सगळं काही सोडून दूर निघून गेले. कुणालाही आशा नव्हती की, त्यांच्यापैकी कुणी वाचेल. पण एक घर या नैसर्गिक संकटातही ठामपणे उभं राहिलं. (हे पण वाचा : यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले)
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्वालामुखीच्या स्फोटानंतर निघालेल्या लाव्हारसाने ३५० पेक्षा जास्त घरे नष्ट झाली. पण सेवानिवृत्त डेनिश दाम्पत्याच्या घराला काहीच झालं नाही. घराची मालकीन म्हणाली की, 'आम्हाला जेव्हा घराबाबत समजलं तेव्हा आम्हाला फार आनंद झाला. आमच्या डोळ्यातून अश्रू निघाले. आम्हाला विश्वास बसत नव्हता की, घर सुरक्षित आहे'.
तेच अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लाव्हा निघण्याचा स्पीड कमी झालाय. त्यासोबतच बचावकार्यही वाढवलं आहे. ते म्हणाले की, धोका अजून पूर्णपणे टळला नाहीये. लोकांना अजून इथे न येण्याचं आवाहन केलं आहे. डेनिश दाम्पत्य घर तयार करणाऱ्या बिल्डरवर खूश आहे. त्यांना आशा आहे की, त्याचा बिझनेस वाढले.