'या' बिस्कीटाच्या एका पीसची किंमत तब्बल १५ लाख रूपये, कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:00 PM2024-06-27T15:00:45+5:302024-06-27T15:01:12+5:30
या बिस्कीटाची किंमत इतकी आहे की, तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता. या बिस्कीटाच्या एका पीसची किंमत १५ लाख रूपये आहे.
सामान्यपणे बाजारात कोणतेही बिस्कीट घ्यायला गेलात तर सरासरी १० रूपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत किंमत बघायला मिळते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा बिस्कीटबाबत सांगणार आहोत ज्याची किंमत तुमच्या कल्पनेपलिकडची आहे. त्याचं कारणंही खास आहे. कारण या बिस्कीटाचा टायटॅनिक या ऐतिहासिक जहाजासोबत संबंध आहे. या बिस्कीटाची किंमत इतकी आहे की, तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता. या बिस्कीटाच्या एका पीसची किंमत १५ लाख रूपये आहे.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या बिस्कीटात इतकं काय आहे की, याची किंमत इतकी आहे. तर यात वेगळं काहीच नाही. हे बिस्कीट मैदा, पाणी आणि साखरेचा वापर करून बनवण्यात आलं आहे. तेच या बिस्कीटाच्या साइजबाबत सांगायचं तर एका बिस्कीटाची साइज १० सेमी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबर २०१५ मध्ये एका बिस्कीटाचा लिलाव करण्यात आला होता. ज्याची किंमत १५,००० पाउंड लागली होती. भारतीय करन्सीनुसार ही किंमत १५ लाख रूपये होते. हा एक अशा बिस्कीटाचा पीस होता जो टायटॅनिकमध्ये सुरक्षित आढळून आला. स्लीपर्स अॅन्ड बेकर्सचा पायलट क्रॅकर बिस्कीट टायटॅनिकच्या एका लाइफ बोटमध्ये ठेवलेल्या एका कीटमध्ये आढळलं होतं. त्यामुळे हे एक बिस्कीट जगातील सगळ्यात महागडं बिस्कीट मानलं जातं.
हे बिस्कीट जेम्स फेनविक नावाच्या व्यक्तीकडे होतं. जेव्हा टायटॅनिक बुडत होतं तेव्हा जेम्सची बोट समुद्रात होती. जेव्हा टायटॅनिक जहाज बुडत असल्याची माहिती यांना मिळाली तेव्हा त्यांचं जहाज बचाव कार्यासाठी आणण्यात आलं होतं. फेनविक यांना बिस्कीट तिथेच सापडलं होतं. त्यांनी हे बिस्कीट आठवण म्हणून जवळ ठेवलं. नंतर याचा लिलाव झाला.
हे बिस्कीट ग्रीसच्या एका कलेक्टरने खरेदी केलं होतं. या बिस्कीटसोबत जेम्स आणि मेबल फेनविक यांनी फोटोही काढले होते. त्याच्या निगेटीव्ह त्यांनी सुरक्षित ठेवल्या होत्या. लिलाव करणाऱ्या संस्थेने सांगितलं की, हे बिस्कीट जगातील सगळ्यात महत्वाचं आहे. या बिस्कीटाआधी कोणतीही वस्तू इतकी महाग विकली गेली नाही.