जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; या किमतीत शेकडो Fortuner खरेदी करता येतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:21 PM2023-04-10T17:21:10+5:302023-04-10T17:21:45+5:30

कधी आणि कुठे झाला या नंबर प्लेटचा लिलाव? जाणून घ्या...

World's Most Expensive Car Number Plate; Hundreds of Fortuners can be bought at this price | जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; या किमतीत शेकडो Fortuner खरेदी करता येतील...

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; या किमतीत शेकडो Fortuner खरेदी करता येतील...

googlenewsNext

आलिशान गाड्यांसोबतच व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर प्लेटचीही लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. या फॅन्सी नंबरच्या खरेदीसाठी लोक मोठी बोली देखील लावतात. हे क्रमांक भारतातील आरटीओ कार्यालयांद्वारे देखील विकले जातात. पण ताजे प्रकरण दुबईचे आहे, जिथे जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट विकली गेली आहे. या दोन अक्षरांच्या नंबर प्लेटच्या किमतीत तुम्ही शेकडो टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही खरेदी करू शकता.

122.5 कोटींची नंबर प्लेट
दुबईमध्ये झालेल्या लिलावादरम्यान एका व्यक्तीने आपल्या कारसाठी 'पी 7' नोंदणी प्लेट खरेदी केली. या क्रमांकासाठी एकूण 55 लाख दिरहमची बोली लागली होती. हा आकडा भारतीय चलनात सुमारे 122.5 कोटी रुपये होतो. 1.25 अब्ज रुपयांची नंबर प्लेट या वर्षी लिलाव होणारी जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असल्याचे मानले जात आहे. याआधी बुगाटी कारच्या मालकाने 132 कोटी रुपयांना "F 1" नंबर प्लेट खरेदी केली होती, ज्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे.
 
नंबर प्लेटसाठी सुरुवातीची बोली 1.5 दशलक्ष दिरहम होती आणि काही सेकंदात बोली 30 दशलक्षच्या पुढे गेली. त्यानंतर काही मिनिटांसाठी बोली 25 दशलक्षवर स्थिरावली. पण याचदरम्यान गर्दीतून आणखी एक बोली लावली गेली आणि या नंबर प्लेटची किंमत 55 दशलक्ष दिरहमवर पोहोचली. ही शेवटची बोली होती आणि त्याच्या खरेदीदाराने आपले नाव न सांगता, 55 दशलक्ष दिरहमांना नंबर प्लेट खरेदी केली. 

लिलावाची रक्कम दान केली जाईल
जुमेराह येथील फोर सीझन्स हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन एमिरेट्स ऑक्शन, दुबई रस्ते आणि वाहतूक प्राधिकरण, एतिसलात आणि डु यांनी केले होते. या कार्यक्रमादरम्यान इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचा लिलाव करण्यात आला आणि या लिलाव प्रक्रियेद्वारे रमजान फूड अपीलसाठी सुमारे 97,920,000 दिरहम म्हणजेच 2 अब्ज 18 कोटी रुपये जमा झाले आहेत. लिलावातून मिळणारी रक्कम वन बिलियन मील्स मोहिमेसाठी दान केली जाईल.

Web Title: World's Most Expensive Car Number Plate; Hundreds of Fortuners can be bought at this price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.