चुकीला माफी नाही! 'या' व्यक्तींना एक चूक पडली महागात, आज होत आहेत कोट्यवधींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:16 PM2019-05-01T14:16:06+5:302019-05-01T14:21:17+5:30
माणूस हा चुकींचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. पण माणसांनी अशा काही चुका केल्या की, आता त्या त्यांच्यासाठी आणि समाजासाठी अभिषाप ठरत आहेत.
(Image Credit : Grant Cardone TV)
माणूस हा चुकींचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. पण माणसांनी अशा काही चुका केल्या की, आता त्या त्यांच्यासाठी आणि समाजासाठी अभिषाप ठरत आहेत. त्यांच्या या चुकांची किंमत आज हजारो-कोटींच्या घरात गेली आहे. अशाच काही चुकांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या फारच छोट्या चुका होत्या पण आर्थिक नुकसान फार मोठं करून गेल्या.
(Image Credit : Government Technology)
१) रशियाचा राजा अलेक्झांडर द्वितीयने १८६८ अलास्काला बर्फाने भरलेली जागा समजून अमेरिकेला केवळ ५० कोटी रूपयांना विकलं होतं. अलास्का खरेदी केल्यानंतर अमेरिकेने तिथे खोदकाम केलं, संशोधन केलं. त्यानंतर त्यांना तिथे कोट्यवधींचं सोनं-चांदी आणि खनिज संपत्ती सापडली. त्यामुळे या जागेची किंमत कितीतरी पटीने वाढली.
(Image Credit : GTspirit)
२) लंडन स्थित वॉकी टॉकी बिल्डींगच्या निर्माणावेळी सिव्हिल इंजिनिअरने एक मोठी चूक केली. त्याच्या या चुकीमुळे इथे सूर्याची इतकी प्रखर किरणे पडू लागली की, तिथे उभी असलेली कारही वितळू लागते. एकदा ही बाब माहीत नसल्याने एका व्यक्तीने तिथे त्याची जग्वार कार पार्क केली. काही वेळाने त्याच्या कारचे पार्ट्स वितळू लागले होते. या बिल्डींगजवळ प्रखर सूर्यकिरणांमुळे इतरही घटना घडू लागतात. जसे की, फार जास्त गरमी, डोळ्यांना धुसर दिसणे इत्यादी. ही बिल्डींग तयार करताना कर्व्ह झाली, ज्यामुळे या बिल्डींगचं नाव वॉकी-टॉकी पडलं. सिव्हिल इंजिनिअरही चूक आजही अभिषाप ठरत आहे.
३) जर तुम्ही इंटरनेट फार पूर्वीपासून वापरत असाल तर तुम्ही एक्साइट.कॉम ने परिचीत असालच. कारण ज्यावेळी याहू जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन होतं तेव्हा दुसरं सर्वात मोठं सर्च इंजिन एक्साइट.कॉम हे होतं. त्यावेळी एक्साइट.कॉमचे सीईओ जॉर्ड बेलला गुगल विकत घेण्यासाठी एक ऑफर मिळाली होती. त्यावेळी गुगलची किंमत केवळ ४८ कोटी रूपये होती. पण कंपनीच्या सीईओ गुगल खरेदी करण्यास नकार दिला. आज गुगलमधून किती कमाई होते हे सर्वांनाच माहीत आहे. आज जर ते गुगल पाहत असतील तर त्यांना नक्कीच त्यांच्या नकाराचा पश्चाताप होत असावा.
४) अॅपलचे फाउंडर स्टीव जॉब्स आणि स्टीव ओज्बिन यांच्यानंतर तिसरे फाउंडर रोन वायनने १९७६ मध्ये त्याच्याकडे असलेले कंपनीचे १० टक्के शेअर केवळ ८०० डॉलरला विकले होते. आता जर भारतीय मुद्रेत ही रक्कम मोजायची झाली तर ती ५ हजार रूपये इतकी होते. जर हे शेअर रोन वायनकडे आज असते तर ते सुद्धा त्यांच्या पार्टनरसारखे कोट्यधीश झाले असते.